Vande Bharat Metro Train : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली आहे. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू करण्यात आली आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या यशानंतर ही वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू झाली आहे.
आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे. अशातच मात्र वंदे भारत मेट्रो ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाला दोन नवीन वंदे भारत मेट्रो ट्रेन मिळणार आहेत.

अहमदाबाद ते भुज नंतर आता या प्रकारातील दोन गाड्या सुरू होणार आहेत. आज आपण ही मेट्रो ट्रेन नेमकी कोणत्या मार्गावर सुरू होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत मेट्रो
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर दिवाळीच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला दोन नवीन वंदे मेट्रो ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली ते आग्रा आणि लखनऊ ते आग्रा या मार्गावर वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. असे झाल्यास या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आग्रा ते नवी दिल्ली दरम्यान वंदे मेट्रो ट्रेन चालवण्याची मागणी होत आहे. जर या मार्गावर वंदे मेट्रो सुरु झाली तर ही ट्रेन नवी दिल्ली इंटरसिटीची जागा घेणार आहे. दुसरी वंदे मेट्रो ट्रेन आग्रा ते लखनौ दरम्यान धावणार आहे.
ही ट्रेन लखनऊ इंटरसिटीची जागा घेईल. आगरा फोर्टवरून ही ट्रेन चालवली जाईल. लखनऊ इंटरसिटी ज्या स्थानकांवर थांबेल त्या सर्व स्थानकांवर ही ट्रेन थांबणार असे बोलले जात आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 110 किमी असेल.
ट्रेनमध्ये 1150 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेन एका दिवसात दोन फेऱ्या करू शकते. त्यामुळे या दोन्ही मार्गावर दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तसेच या गाड्यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची देखील शक्यता आहे.