मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने 502 एकरावरील शिर्डी एमआयडीसी आणि डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन ! ना. विखे म्हणतात, ‘शिर्डी लवकरच……

ना. विखे पाटील यांनी, 'एमआयडीसी शिर्डी व परिसरातील युवकांसाठी नवा आशेचा किरण आहे‌. यामुळे हजारो तरूणांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार असे म्हटले आहे. तसेच विखे पाटील यांनी कोपरगावात एमआयडीसी उभारण्यासाठी शेती महामंडळाची ३०० एकर जागा विनाशूल्क उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

Published on -

Radhakrishan Vikhe Patil News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सावळी विहीर येथील नियोजित एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

सावळी विहीर एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. खरंतर, एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टर चे काम पूर्ण झाल्यानंतर शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल अशी आशा आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, निबे लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्योगमंत्र्यांनी येत्या काळात पाच डिफेन्स क्लस्टर तयार केले जातील आणि यातीलच एक डिफेन्स क्लस्टर हे शिर्डी एमआयडीसी मध्ये तयार करण्यात येत आहे अशी माहिती दिली. या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून येथे तब्बल 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

एवढेच नाही तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येत्या काळात शिर्डी बरोबर कोपरगाव येथेही औद्योगिक वसाहत स्थापित होईल अशी मोठी घोषणा केली आहे. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

विखे पाटील काय म्हणालेत?

ना. विखे पाटील यांनी, ‘एमआयडीसी शिर्डी व परिसरातील युवकांसाठी नवा आशेचा किरण आहे‌. यामुळे हजारो तरूणांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार असे म्हटले आहे.

तसेच विखे पाटील यांनी कोपरगावात एमआयडीसी उभारण्यासाठी शेती महामंडळाची ३०० एकर जागा विनाशूल्क उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

तसेच, शिर्डी एमआयडीसीमुळे शिर्डी, राहाता, कोपरगाव या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा देखील त्यांनी उपस्थित केली आहे.

एवढेच नाही तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असे सांगत शिर्डी एक ‘औद्योगिक हब’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe