आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ तारखेला विधानसभा निवडणुका जाहीर होणार, वाचा सविस्तर

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. अजून दोन्ही गटाकडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत मात्र लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर येणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण नुकताच साजरा झाला आहे. विजयादशमी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असे म्हटले जात होते.

मात्र अजून निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. खरे तर 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार आहे. विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होणे अपेक्षित आहे.

मात्र निवडणूक आयोगाने अजून तारखांची घोषणा केलेली नसल्याने निवडणुका कधी होणार हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. तथापि निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी देखील राजकीय पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी मात्र जोरात सुरू आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. अजून दोन्ही गटाकडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत मात्र लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर येणार आहे.

अशातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत एक मोठे विधान केले आहे. निवडणुकांची घोषणा कधी होऊ शकते? याबाबत पवार यांनी मोठा दावा केला आहे.

शरद पवार काय म्हणतात?

शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात शुक्रवारपासून आचारसंहिता लागू शकते. अर्थातच शुक्रवारी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भाजपा नेते तथा तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. खरेतर चरण वाघमारे हे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. पण ही जागा अजित पवार यांच्या गटाला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार राजू कारेमोरे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे.

यामुळे चरण वाघमारे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. वाघमारे यांना विद्यमान आमदार यांच्या विरोधात शरद पवार गट निवडणुकीसाठी उभे करणार असे बोलले जात आहे. याच कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा शुक्रवारी होऊ शकते असा दावा केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe