DTP Maharashtra Bharti: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत “कनिष्ठ आरेखक गट-क, अनुरेखक गट – क” या पदांच्या एकूण 154 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 Details
जाहिरात क्रमांक: 02/2024 & 03/2024
पदाचे नाव आणि तपशील:
जाहीरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
02/2024 | 01. | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
03/2024 | 02. | अनुरेखक गट – क | 126 |
एकूण | 154 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्रमांक 01:
- बारावी उत्तीर्ण
- आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य
- Auto -CAD किंवा geographical information system in spatial planning
पद क्रमांक 02:
- बारावी उत्तीर्ण
- आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य
- Auto -CAD किंवा geographical information system in spatial planning
टीप: शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि पात्रता तपासावी.
वयोमर्यादा:
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1,000/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
महत्त्वाच्या लिंक:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र.01: येथे क्लिक करा पद क्र.02: येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (18 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://dtp.maharashtra.gov.in/ |