सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अखेर सरकारने महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले, किती वाढला DA ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता सुधारित केला जातो. जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात होतो अन जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता ऑक्टोबर महिन्यात होतो.

Published on -

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची समोर येत आहे. दिवाळीच्या आधीच या मंडळीला मोठी भेट मिळाली आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसापासून ज्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहिली जात होती त्याबाबत आज सरकारने निर्णय घेतला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने आज सरकारी कर्मचाऱ्यांचा अन पेन्शन धारकांचा DA अर्थातच महागाई भत्ता 3% वाढवला आहे. आतापर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र आता यामध्ये 3% ची वाढ करण्यात आली आहे.

यामुळे दिवाळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली असल्याचे बोलले जात आहे. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, महागाई भत्ता 50% वरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर 9 ऑक्टोबरला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होणार असे बोलले जात होते.

पण त्यावेळी यावर निर्णय झाला नाही. यामुळे सदर नोकरदार मंडळीत मोठी संभ्रमअवस्था पाहायला मिळतं होती. मात्र आज यावर अंतिम निर्णय झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. तथापि, याचा रोख लाभ हा ऑक्टोबर महिन्याचा पगारासोबतचं दिला जाणार आहे. अर्थातच सदर नोकरदार मंडळीला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता सुधारित केला जातो. जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात होतो अन जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता ऑक्टोबर महिन्यात होतो.

या वर्षी मार्च महिन्यात जानेवारी 2024 पासून चा महागाई भत्ता वाढवण्यात आला. आता ऑक्टोबर महिन्यात जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवला गेला आहे. सरकारने याबाबतचा निर्णय आज घेतलाय.

आता ऑक्टोबरच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना देखील लवकरच याचा लाभ मिळणार आहे.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे, यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शन धारकांचा महागाई भत्ता हा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरचं सुधारित केला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News