अहिल्यानगर : सचिन कोतकर यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल, कोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार ?

माजी महापौर संदीप कोतकर यांचे बंधू सचिन कोतकर यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सध्या नगर शहरात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्हाट्सअप ग्रुप वर झालेल्या वादावादी नंतर सचिन कोतकर यांनी सदर व्हाट्सअप ग्रुपच्या एडमिनला फोन करून वादावादी झालेल्या व्यक्तीला ग्रुप मधून काढून टाकण्यासाठी शिवीगाळ केला असल्याचा आरोप आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशातच अहिल्यानगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा असून या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचपणी सुद्धा केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळातच संदीप कोतकर आणि त्यांचे बंधू सचिन कोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांचे बंधू सचिन कोतकर यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सध्या नगर शहरात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्हाट्सअप ग्रुप वर झालेल्या वादावादी नंतर सचिन कोतकर यांनी सदर व्हाट्सअप ग्रुपच्या एडमिनला फोन करून वादावादी झालेल्या व्यक्तीला ग्रुप मधून काढून टाकण्यासाठी शिवीगाळ केला असल्याचा आरोप आहे.

यावेळी सचिन कोतकर यांनी सदर व्यक्तीला शिवीगाळ करताना बौद्ध समाजाबद्दल आणि मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आंबेडकरी आणि मातंग समाजाबद्दल केलेल्या या वादग्रस्त विधानाची ऑडिओ क्लिप सध्या संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यात वायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून आणि मातंग समाजाच्या माध्यमातून या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील आंबेडकरी समाज बांधवांनी मोर्चा देखील काढला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आंबेडकरी समाज बांधवांनी मोर्चा काढला असून आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सचिन कोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याद्वारे गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन देखील देण्यात आले आहे.

सचिन कोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने यावेळी दिलाय. दुसरीकडे या प्रकरणी सचिन कोतकर यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

सदर ऑडिओ क्लिप मध्ये व्हायरल होणारा आवाज आपला नाही, या प्रकरणाशी आपला तीळ मात्रही संबंध नाही असे स्पष्टीकरण सचिन कोतकर यांनी दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करावी अशी मागणी कोतकर यांनी केली आहे. कोतकर यांनीही याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

एकंदरीत ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ऑडिओ क्लिप समोर आली असल्याने सचिन कोतकर यांच्यासह विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या संदीप कोतकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात चौकशीनंतर काय सत्य समोर येणार याकडे विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe