कोपरगाव : विद्यमान आ. आशुतोष काळेच महायुतीचे उमेदवार, मविआकडून कोल्हे मैदानात उतरणार; काळे की कोल्हे कोण मारणार बाजी ?

विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना नगर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फुल पाठिंबा आहे. दुसरीकडे कोल्हे यांना बाळासाहेब थोरात यांचा सपोर्ट राहिला आहे. यामुळे कोपरगाव विधानसभा निवडणूक यंदा मोठी लक्षवेधी ठरणार यात शंकाच नाही.

Tejas B Shelar
Published:
Koprgaon Vidhansabha Nivdnuk

Koprgaon Vidhansabha Nivdnuk : अहिल्यानगर जिल्ह्यात जेव्हापासून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तेव्हापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड नगर जिल्ह्यात घडत आहे. यामुळे नगर जिल्हा राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या काही दिवसांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. खरेतर, मध्यंतरी राज्याच्या राजकारणात झालेल्या भूकंपामुळे नगर जिल्ह्यात याआधी कधीही न पाहिलेल्या आणि न ऐकलेल्या गोष्टी घडल्या आहेत. कोपरगाव बाबत बोलायचं झालं तर येथे पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे एकाच गटात आले आहेत.

मात्र एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असे बोलले जाते आणि आता याच ऊक्तीप्रमाणे काळे आणि कोल्हे जास्त दिवस एकाच गटात राहणार नसल्याचे दिसते. खरे तर महायुतीकडून कोपरगावची जागा अजित पवार गटाला सुटणार आहे. यामुळे येथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार आशुतोष काळे हेच उमेदवार असतील हे जवळपास फिक्स झाले आहे.

यामुळे मात्र युवा नेते विवेक कोल्हे यांची पंचाईत झाली आहे. गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे अशी लढत झाली होती. मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर काळे हे अजित पवार गटासोबत राहिलेत आणि ते सध्या महायुतीचा भाग आहेत.

विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना नगर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फुल पाठिंबा आहे. दुसरीकडे कोल्हे यांना बाळासाहेब थोरात यांचा सपोर्ट राहिला आहे. यामुळे कोपरगाव विधानसभा निवडणूक यंदा मोठी लक्षवेधी ठरणार यात शंकाच नाही.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे गेल्या दहा वर्षांपासून भाजपा मध्ये आहेत. मात्र विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याने कोल्हे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

तथापि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे हे ठाकरे गटाच्या चिन्हावर येथून निवडणुकीसाठी उभे राहू शकतात अशा चर्चांचे गुऱ्हाळ सध्या कोपरगावात सुरू आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीतही दोन पारंपारिक विरोधी गटात अर्थात काळे विरुद्ध कोल्हे अशीच लढत येथे पाहायला मिळणार असे भासते.

काळे की कोल्हे कोण मारणार बाजी?

आ. काळे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघात मोठमोठी कामे केली आहेत. १३१ कोटीं रुपयांची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन शहराचा जिव्हाळ्याचा व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणीप्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. शहरवासीयांना आठ दिवसांआड नव्हे, तर तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने महिलांसह शहरवासीयांत अगदीच आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या पाच वर्षांत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कुठेही कमी पडलो नसून, तब्बल ३००० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे. दुसरीकडे आपण विकासाच्या जोरावरच यंदाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये जाणार आणि निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आगामी निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. यामुळे काळे हे सध्या फ्रंट सीटवर असून सध्याचे गणित पाहता त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. तथापि कोपरगावचा पुढील आमदार कोण राहणार हे 23 नोव्हेंबरलाचं समोर येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe