Discount On Smartphone: 56 हजारापेक्षा जास्त किमतीचा वनप्लसचा ‘हा’ स्मार्टफोन 36 हजारांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी! करा या संधीचे सोने

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांकरिता वनप्लस 11 5G वर आकर्षक बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात असून या ऑफर अंतर्गत जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला बरेच पैसे वाचवता येणार आहेत.

Ajay Patil
Published:
oneplus 11 smartphone

Discount On Smartphone:- सणासुदीच्या कालावधीमध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक आकर्षक अशा बंपर डिस्काउंट ऑफर दिल्या जात असून या माध्यमातून महागडी घरगुती उपकरणे तसेच स्मार्टफोन व इतकेच नाहीतर कार आणि बाईक खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असून अशा खरेदीतून ग्राहक मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करू शकणार आहेत.

स्मार्टफोनच्या बाबतीत बघितले तर सध्या तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणावर वनप्लस वापराकडे असल्याचे आपल्याला दिसून येते व या वनप्लस सेगमेंटमध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन येतात.

आपल्याला माहित आहे की वन प्लस स्मार्टफोनच्या किमती या जास्त असल्याने प्रत्येकालाच इच्छा असून देखील वाढीव असलेल्या किमतीमुळे हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत.

परंतु तुम्हाला देखील जर वनप्लस स्मार्टफोन घ्यायचा असेल तर वनप्लस 11 या स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर दिली जात असून या ऑफर अंतर्गत तुम्ही सर्वात कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांकरिता वनप्लस 11 5G वर आकर्षक बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात असून या ऑफर अंतर्गत जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला बरेच पैसे वाचवता येणार आहेत.

 वनप्लस 11 च्या किमतीमध्ये केली मोठी कपात

वनप्लस 11 128 जीबी स्मार्टफोन हा सध्या फ्लिपकार्ट वर 56 हजार 999 रुपयांच्या किमतीमध्ये लिस्टेड आहे. परंतु दिवाळी पूर्वीच्या सेल ऑफरमध्ये कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना या फोनवर 35 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे.

त्यामुळे या सेल ऑफरनंतर तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही अवघ्या ३६५९६ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.

तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने जर हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅकचा देखील लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे जर बजेट कमी असेल तर तुम्ही दरमहा 1287 रुपयांच्या ईएमआयवर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.

 काय आहेत वनप्लस 11 5G स्मार्टफोनचे फीचर्स?

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा AMOLED पॅनल असलेला डिस्प्ले मिळतो व या अंतर्गत तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 800 नीट्स पर्यंत ब्राईटनेस मिळतो.

डिस्प्ले सुरक्षित राहावा याकरिता यामध्ये कॉर्निंग गोरीला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला असून तो उत्तम परफॉर्मन्स साठी उत्तम आहे.

या स्मार्टफोनमध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. उत्तम फोटोग्राफी करता यावी याकरिता या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला म्हणजेच मागच्या पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला असून जो 50 मेगापिक्सल, 32 आणि 48 मेगापिक्सल चा कॅमेरा प्रदान करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe