रब्बी हंगामात गहू पेरणी करताय ? मग गव्हाच्या ‘या’ जातीपासून शेतकऱ्यांना मिळणार अधिकचे उत्पादन ! वाचा सविस्तर

यावर्षी पावसाळी काळात चांगला पाऊस झाला असल्याने यंदा गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. गेल्यावर्षी कमी पाऊस असतानाही गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय होते. यंदा तर चांगला पाऊस असल्याने हे क्षेत्र आणखी वाढेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Published on -

Wheat Farming : खरीप हंगामानंतर आता देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांची यंदा मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाळी काळात चांगला पाऊस झाला असल्याने यंदा गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे.

गेल्यावर्षी कमी पाऊस असतानाही गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय होते. यंदा तर चांगला पाऊस असल्याने हे क्षेत्र आणखी वाढेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता

HD 4728 (पुसा मलावी) : HD 4728 अर्थातच पुसा मलावी ही गव्हाची एक प्रमुख जात आहे. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय वाण आहे. ही जात 125-130 दिवसात परिपक्व होते. देशातील अनेक प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये याची लागवड होते.

या जातीपासून हेक्टरी 55-60 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते. ही जात भारतातील सर्वचं राज्यांमध्ये उत्पादीत होत असल्याचा दावा केला जात आहे. गव्हाची जी जात बागायती भागात उपयुक्त आहे.

पुसा तेजस 8759 : पुसा तेजस ही देखील गव्हाची एक सुधारित जात आहे. या जातीचे पीक अवघ्या 110 ते 115 दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.

देशातील अनेक गहू उत्पादक राज्यांमध्ये ही जात पेरली जाते. शेतकऱ्यांना या जातीपासून हेक्टरी 70 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

श्री राम सुपर 111 : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गव्हाची ही प्रमुख जात फायदेशीर ठरणार आहे. गव्हाची ही एक प्रमुख जात आहे. वास्तविक ही जात ओसाड जमिनीवरही पिकवता येते.

नापिक जमिनीतूनही या जातीपासून सहजतेने 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते आणि जमीन जर चांगली सुट्टी असेल तर 80 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. गव्हाची ही जात अवघ्या 105 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गहू GW 273 : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीच्या गव्हाच्या पिकाला किमान तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते. यातून गहू उत्पादक शेतकऱ्यांना 60 ते 65 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळू शकते असा दावा तज्ञांनी केला आहे. गव्हाच्या या सुधारित जातीचे पीक 120 ते 125 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते असे तज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe