8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाअन्वये 7th पे कमिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
त्यानुसार हा भत्ता आता 53 टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात जरी झाला असला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या संबंधित नोकरदार मंडळीला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महागाई भत्ता वाढीचा आणि फरकाचा हा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे. यामुळे ऐन दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे दिसते. दरम्यान दिवाळीच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ही आनंदाची बातमी आहे आठवा वेतन आयोगा संदर्भात. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून आठवा वेतन आयोगाची मागणी जोर धरत आहे. वर्तमान सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे.
यामुळे पुढील आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग लागू होण्याआधी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सातवा वेतन आयोगाची स्थापना ही 2014 मध्ये झाली होती. त्यानुसार 2024 मध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे.
त्यानंतर मग एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या पाच महिन्यांनी आठवा वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवावेतन आयोग याबाबत घोषणा होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
त्याचे कारण म्हणजे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास. वेतन आयोगाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे. यामुळे 2025 मध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत घोषणा होईल आणि त्यानंतर एक जानेवारी 2026 पासून हा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि यासंदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र जर हा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान मूळ पगार कितीने वाढणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
पगार कितीने वाढणार
सातवा वेतन आयोग जेव्हा लागू झाला होता तेव्हा 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरसह किमान मूळ वेतन ₹7,000 वरून ₹18,000 पर्यंत वाढवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, किमान निवृत्ती वेतन ₹3,500 वरून ₹9,000 पर्यंत वाढवले गेले होते. कमाल पगार ₹2,50,000 आणि कमाल पेन्शन ₹1,25,000 निश्चित करण्यात आली होती.
रिपोर्ट्सनुसार, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी 3.68 च्या फॅक्टरची मागणी करण्यात आली होती, पण सरकारने त्याची अंमलबजावणी 2.57 ला केली. आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 असण्याची शक्यता आहे.
जर 1.92 चा घटक निश्चित केला असेल, तर सध्याचे किमान वेतन ₹18,000 वरून अंदाजे ₹34,560 पर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे, किमान पेन्शन देखील सुमारे ₹ 17,280 पर्यंत वाढू शकते. म्हणजेच किमान मूळ पगार हा जवळपास दुप्पट वाढणार आहे आणि किमान पेन्शन देखील दुप्पट होणार आहे.