Parner News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजला आहे. आता याचं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट कमालीचा सक्रिय झाला आहे. नुकतीच अजित पवार गटाच्या माध्यमातून पारनेर येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत अजित पवारांनी ज्या चार मुद्द्यांवर लंके लोकसभा निवडणूक जिंकलेत त्यांचं मुद्द्यांवरून त्यांना टार्गेट केले आहे. या सभेवेळी अजित पवारांनी जवळपास 38 मिनिटे भाषण केले. यातील 35 मिनिटे त्यांनी महायुती सरकारकडून सुरू असणाऱ्या विकासकामांची आणि योजनांची माहिती दिली.
तीन मिनिटे ते लंके यांच्यावर बोललेत. या तीन मिनिटात अजित पवारांनी लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांनी लंके कडे सध्या खासदारकी आहे.
आता ते आमदारकी देखील आपल्याच घरात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दोन्ही पदे त्याच्याकडे गेलीत तर पारनेर तालुक्याला कोणी वाली उरणार नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
ज्या मुद्द्यांवर लोकसभा जिंकलेत त्याच मुद्द्यांवर अजित पवारांचा पलटवार
निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक संपूर्ण राज्यभर झाले. याचा निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत देखील फायदा झाला. दरम्यान याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी लंके यांच्यावर टीका केली.
कोरोना काळात आपण लंके यांना मदत केली असल्यानेचं त्यांना कोरोना काळात काम करता आले असा युक्तिवाद अजित पवारांनी केला. तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला असल्याचा दावा निलेश लंके सातत्याने करत असतात.
यावर बोलताना आपणच लंके यांना एवढा भरीव निधी दिला असल्याचे अजित पवारांनी म्हटले. पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी आपण दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
मात्र माझ्या कामाचे श्रेय दुसरेच कोणी घेत आहे असे म्हणत त्यांनी निलेश लंके यांचे कान टोचले. कुकडी प्रकल्पाचा मुद्दा देखील निलेश लंके यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
यावर बोलताना जर केंद्राच्या विचाराचे महायुती सरकार राज्यात आले तर सह्याद्रीच्या डोंगर रागांवरून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून कुकडीच्या पाण्याची उपलब्धता वाढवली जाईल अन पारनेरच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघेल असे त्यांनी यावेळी म्हटले.
अहिल्या नगर मधील तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत असे सातत्याने लंके यांच्याकडून म्हटले गेले आहे. दरम्यान यावर बोलताना अजित पवार यांनी सुपा एमआयडीसी मधील गुंडगिरीचा प्रश्न उपस्थित करत लंके यांच्यावर टीका केली.
सुपा एमआयडीसी मध्ये जी गुंडगिरी सुरू आहे, जी दहशत सुरू आहे यामुळे येथे उद्योग येत नाहीत मात्र आपण या ठिकाणी उद्योगांसाठी चांगले वातावरण तयार करू असे आश्वासन पवारांनी दिले.