Medical Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण येणाऱ्या खर्चाचा विचार केला तर यामध्ये मेडिकल म्हणजेच वैद्यकीय उपचारासाठी अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो व हा खर्च प्रत्येकालाच परवडतो असा नसतो. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या उद्भवते तेव्हा ती कोणालाही न सांगता उद्भवते व केव्हा उद्भवेल याची कुठलीच गॅरंटी नसते.
अशा परिस्थितीत जर मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च करण्याची वेळ आली तर मात्र खूप धांदल उडते. अशावेळी खर्च भागवण्यासाठी बऱ्याचदा पर्सनल लोनचा आधार घेतला जातो.
परंतु पर्सनल लोन व्यतिरिक्त तुम्ही जर उपचाराकरिता मेडिकल लोन म्हणजे वैद्यकीय कर्जाची मदत घेतली तर तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो.
मेडिकल लोन हा पर्सनल लोन सारखाच एक प्रकार असून या माध्यमातून तुम्हाला उपचारासाठी लागणारा पैसा मिळू शकतो. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची गरज या माध्यमातून भागवली जाते. या लोनमुळे हॉस्पिटलचे बिल तसेच ऑपरेशन व औषध तसेच इतर उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी मदत होते.
काय आहेत मेडिकल लोनची वैशिष्ट्ये?
1- ताबडतोब आणि सोपी प्रक्रिया– मेडिकल लोनकरिता बँका आणि इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी यांनी डिजिटल पद्धत अवलंबली आहे.
या प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी पासून तर अर्जदाराची पात्रता तपासणी इत्यादी प्रक्रिया खूप जलद पद्धतीने केली जाते व लवकरात लवकर लोन मंजूर होते. तुम्ही अर्ज केल्यानंतर साधारणपणे दोन ते सात दिवसात कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते.
2- लागतात कमीत कमी आणि सोपी कागदपत्रे– यामध्ये लागणारी कागदपत्रे ही पर्सनल लोनला लागणाऱ्या कागदपत्रांसारखेच असतात व प्रामुख्याने ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड,
पत्त्याच्या पुराव्यासाठी इलेक्ट्रिसिटी बिल तसेच आधार कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र( सॅलरी स्लिप, फॉर्म 16) कागदपत्रांची आवश्यकता भासते. यामध्ये ग्राहक जर स्थानिक असतील तर त्यांना कमी कागदपत्रांची गरज भासते.
3- कर्ज परतफेडीचा कालावधी– मेडिकल लोन घेतल्यानंतर त्या लोनच्या परतफेडीसाठी एक ते पाच वर्षांचा कालावधी मिळतो व महत्त्वाचे म्हणजे काही बँकांच्या माध्यमातून सात वर्षांपर्यंत हा कालावधी मिळू शकतो. यामध्ये आर्थिक परिस्थिती बघून पैसे परत करण्याची सवलत मिळत असते.
पर्सनल लोन आणि मेडिकल लोनमध्ये काय आहे फरक?
1- कर्ज घेण्याचा उद्देश– पर्सनल लोन हे प्रामुख्याने घराची दुरुस्ती तसेच लग्न किंवा सहलीचे आयोजन इत्यादीसाठी आपण करू शकतो. परंतु त्या उलट मात्र मेडिकल लोनचा वापर हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याकरिता, एखादया शस्त्रक्रियेचा खर्च किंवा औषध इत्यादीसाठी केला जातो.
2- व्याजाचे दर– व्यक्तिगत कर्जाच्या व्याजदरात अनेकदा चढ-उतार होऊ शकतात. परंतु मेडिकल लोनच्या संदर्भातील जे काही व्याजदर असतात ते स्थिर असतात. साधारणपणे मेडिकल लोनचे व्याजदर हे क्रेडिट स्कोर आणि बँकेची पॉलिसी काय आहे यावर प्रामुख्याने अवलंबून असतात.
3- कागदपत्रांमध्ये फरक– मेडिकल लोन साठी लागणारे कागदपत्रे लवकर आपल्याला जमा करता येतात व पर्सनल लोन साठी मात्र याकरिता दीर्घ प्रक्रिया असू शकते.
4- आधी मंजूर झालेले कर्ज– बँकेचे ग्राहक आधी मंजूर झालेल्या कर्जाचा वापर उपचारासाठी करू शकतात. परंतु परतफेडीच्या अटी मात्र कठीण असतात.