अजित पवार गटाचे 17 उमेदवार ठरलेत, कोपरगावातून आशुतोष काळे यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ ! कोणा-कोणाला मिळाली संधी ?

Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी होत आहेत. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नुकतीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

बीजेपी ने आपल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली असून भारतीय जनता पक्षा पाठोपाठ महायुती मधील अजित पवार गटाची पहिली यादी देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाने 17 जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत.

ज्या लोकांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत त्यांना अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तिकीट जाहीर केले जाणार आहे. यात अजित पवार गटाच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अशुतोष काळे यांना देखील अजित पवार गटाकडून एबी फॉर्म दिला गेला असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या हवाल्यातून समोर येत आहे.

अर्थातच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच तिकीट मिळणार हे फिक्स झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली होती.

यावेळी अजित पवार यांच्याकडून 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत त्यांची यादी आता समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण अजित पवार गटाकडून कोणत्या 17 लोकांना उमेदवारी दिली जाईल याची माहिती पाहणार आहोत.

अजित पवार गटाकडून या 17 लोकांना हमखास मिळणार उमेदवारी

1. संजय बनसोडे
2. चेतन तुपे
3. सुनील टिंगरे
4. दिलीप वळसे पाटील
5. दौलत दरोडा
6. राजेश पाटील
7. दत्तात्रय भरणे
8. आशुतोष काळे
9. हिरामण खोसकर
10. ⁠नरहरी झिरवळ
11. ⁠छगन भुजबळ
12. ⁠भरत गावित
13. ⁠बाबासाहेब पाटील
14. ⁠अतुल बेनके
15. ⁠नितीन पवार
16. ⁠इंद्रनील नाईक
17. ⁠बाळासाहेब आजबे