‘या’ 4 तारखांना जन्मलेल्या मुली माहेर अन सासरच्या लोकांसाठी भाग्यवान असतात ! करोडोंची संपत्ती कमावतात, तुमच्या घरात आहे का कुणी ?

या तारखांना जन्मलेल्या मुलींना आयुष्यात कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही हे विशेष. या मुलींवर माता लक्ष्मीची नेहमीच कृपा राहते. माहेर तसेच सासरमध्ये सुद्धा या मुली नेहमीच खुश असतात. या मुलींच्या आगमनामुळे सासरच्या लोकांचेही भाग्य चमकते.

Published on -

Numerology Marathi : अंकशास्त्र हे ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमान सांगता येऊ शकते. व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरूनच त्याची सर्व जन्म कुंडली आपल्यासमोर येते. अंकशास्त्रात मुलांकला फार महत्त्व देण्यात आले आहे.

मूळांकानुसार व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व इत्यादी गोष्टी उघड होतात. मुलांक हा जन्म तारखे वरून निघत असतो अन मुलांक हा एक ते नऊ दरम्यान असतो. दरम्यान आज आपण 3 मुलांक असणाऱ्या लोकांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या अर्थातच जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंतच्या कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला होतो, त्यांचा मुलांक हा 3 असतो. अंक ज्योतिष शास्त्रानुसार तीन मुळांक असणाऱ्या मुली फारच भाग्यवान असतात.

या मुली आपल्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांसाठी खूपच लकी ठरतात आणि या मुली करोडो अफाट संपत्ती कमवतात. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या या ४ तारखांना झालाय अर्थातच त्यांचा मुलांक तीन आहे त्यांचा अधिपती ग्रह गुरु असतो.

म्हणजेच या लोकांच्या जीवनावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. वास्तविक, मूलांक क्रमांक 3 हा गुरू ग्रहाद्वारे दर्शविला जातो. हा ग्रह या लोकांच्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकण्याचे काम करतो. या मुलांकाच्या लोकांवर नेहमीचं बृहस्पति ग्रहाचा आशीर्वाद असतो.

3 मुलांक असणाऱ्या मुलींबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना अंकशास्त्रात खूप भाग्यवान मानले जाते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नशीब त्यांना पूर्ण साथ देते आणि त्यांना कधीही अडचणीत येऊ देत नाही.

या तारखांना जन्मलेल्या मुलींना आयुष्यात कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही हे विशेष. या मुलींवर माता लक्ष्मीची नेहमीच कृपा राहते. माहेर तसेच सासरमध्ये सुद्धा या मुली नेहमीच खुश असतात.

या मुलींच्या आगमनामुळे सासरच्या लोकांचेही भाग्य चमकते. काम कितीही मोठं असलं तरी त्यांच्याकडे नेहमी पैशाची व्यवस्था असते. या मुली आनंद आणि समृद्धीने भरलेले जीवन जगतात. या तारखांना जन्मलेल्या मुली बृहस्पतिच्या प्रभावामुळे खूपचं हुशार असतात.

त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते उच्च शिक्षण घेतात आणि करिअरमध्ये उच्च स्थान मिळवतात. आपल्या स्वतःच्या जोरावर या मुली भरपूर पैसा आणि मालमत्ता कमावतात. एक वेळ अशी येते की त्या करोडोंच्या मालमत्तेच्या मालकीन बनतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe