नवउद्योजकांसाठी केंद्र सरकारने दिली दिवाळी भेट! केंद्र सरकारने ‘या’ योजनेची कर्ज मर्यादा 10 लाखावरून केली 20 लाख; सरकारने जारी केली अधिसूचना

Pradhanmantri Mudra Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून उद्योग स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवल्या जातात.

या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत केली जाते व  व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना अशा योजनांचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे नवीन व्यवसाय स्थापन करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांसाठी सरकारच्या या योजना खूप वरदान ठरतात.

केंद्र सरकारच्या योजनांमध्ये आपल्याला माहित असलेली एक सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना होय. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजारापासून ते दहा लाख रुपयापर्यंत व्यवसाय उभारणीसाठी कर्ज देण्यात येत होते.

परंतु आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये केली आहे व त्या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी नवउद्योजकांना  सरकारच्या माध्यमातून ही एक मोठी भेट देण्यात आली आहे.

 प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आता दहा नाहीतर मिळणार वीस लाख रुपये कर्ज

देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला होता व यामध्ये घोषणा केली होती की, मुद्रा योजनेअंतर्गत असलेले दहा लाख रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून ती 20 लाख रुपये करण्यात आली होती.

ही कर्जमर्यादा वाढवल्यामुळे मुद्रा योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यास मदत होईल व नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतील.

 सध्या मुद्रा योजनेअंतर्गत इतके दिले जाते कर्ज

सध्या आपण या योजनेच्या संदर्भात बघितले तर या योजनेमध्ये शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी करण्यात आलेले आहेत व अशा तिन्ही श्रेणीनुसार कर्ज दिले जाते. या तीन श्रेणी व्यतिरिक्त आता यामध्ये तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणारे पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंत  मुद्रा कर्ज घेऊ शकतात.

तरुण योजनेअंतर्गत पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण नियम या योजनेत आहे. ज्या व्यवसायिकांनी तरुण योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरित्या परतफेड केले असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीकरिता आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत आता दहा लाख ते वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहेत.

इतकेच नाहीतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मायक्रो युनिट साठी क्रेडिट गॅरंटी फंड अंतर्गत वीस लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर हमी कव्हरेज देखील दिले जाणार आहे.