बातमी कामाची ! चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक किती दिवसाठी चालतो? बँकेचे नियम काय सांगतात?

Ahmednagarlive24 office
Published:

Banking Rules : अलीकडे भारतात कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. कॅश ऐवजी आता डिजिटल पद्धतीने व्यवहार होत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे पैशांचे व्यवहार हे आधीच्या तुलनेत अधिक सोपे झाले आहेत. पण, आजही काही व्यवहारांमध्ये पैशांचा वापर होतो.

तसेच काही व्यवहार हे चेकच्या माध्यमातून पूर्ण केले जातात. जर तुम्ही ही पैशांच्या व्यवहारासाठी चेकचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक किती दिवसांसाठी वैध राहतो या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत आरबीआयचे नियम नेमके काय आहेत? हे पाहणार आहोत.

चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक किती दिवस चालतो?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणत्याही चेकवर तारीख नसल्यास व्यक्ती आपल्या सोयीनुसार ठराविक तारखेला चेक जमा करु शकतो. पण जर चेकवर तारीख टाकलेली असेल तर अशा प्रकरणात चेक किती दिवस वैध राहतो. म्हणजे हा चेक किती दिवस चालतो ? हा प्रश्न आहे.

दरम्यान आज आपण याचबाबत जाणून घेणार आहोत. आरबीआयच्या नियमांनुसार, तारीख लिहिल्यानंतर चेकची वैधता ही जवळपास 90 दिवस असते. अर्थातच चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक पुढील 3 महिने वैध असतो. खरेतर, आधी ही वैधता सहा महिने होते.

म्हणजे आधी चेकवर तारीख लिहिल्यानंतर तो चेक पुढील सहा महिने चालत असे. पण, एप्रिल 2012 मध्ये आरबीआयने या नियमांमध्ये बदल केला आणि पूर्वीची मुदत कमी करून टाकली. आता चेकवर तारीख टाकल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात याची वैधता संपते. एप्रिल 2012 पासून हा निर्णय लागू आहे. यामुळे जर तुम्हीही चेकने व्यवहार करत असाल तर बँकेचा हा नियम तुमच्यासाठी जाणून घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe