अहो कसली करता मुलांच्या भविष्याची चिंता! वापरा गुंतवणुकीसाठी ‘हा’ फॉर्म्युला; मुल 21 व्या वर्षीच होईल कोट्याधीश

तुम्हाला देखील तुमच्या मुलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे असेल तर नियोजनबद्ध गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. यामध्ये जर तुम्ही 21×10×12 चा फार्मूला वापरला तर तो तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतो व तुमचा मुलगा जेव्हा 21 वर्षाचा होईल तेव्हा तो कोट्याधीश होऊ शकतो.

Ajay Patil
Published:
investment tips

Investment In Mutual Fund SIP:- कष्टाने कमावलेला पैसा व त्या पैशाची बचत करणे खूप गरजेचे असते. तुम्ही जेव्हा पैशांची बचत करतात तेव्हा ती बचत मात्र चांगल्या ठिकाणी गुंतवणे देखील तितकेच गरजेचे असते.कारण नुसती बचत करून फायदा होत नाही तर ती बचत चांगल्या ठिकाणी गुंतवूण तुमचा पैसा वाढू शकतो म्हणजे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.

त्यामुळे गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. भविष्यामध्ये मुलांची लग्न तसेच त्यांचे शिक्षण, आयुष्य जगत असताना उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या जसे की वैद्यकीय खर्च या व इतर अनेक समस्यांसाठी आपल्याला गुंतवणूक फार महत्त्वाची ठरते.

यामध्ये प्रत्येक पालकाला मुलांचे शिक्षण तसेच त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून लागणारा पैसा याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर काळजी असते. मुलांचे शिक्षण व लग्नकार्य तसेच इतर गोष्टी करिता पैसा अपूर्ण पडू नये म्हणून बरेच जण प्लॅनिंग करत असतात व गुंतवणूक करतात.

या अनुषंगाने तुम्हाला देखील तुमच्या मुलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे असेल तर नियोजनबद्ध गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. यामध्ये जर तुम्ही 21×10×12 चा फार्मूला वापरला तर तो तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतो व तुमचा मुलगा जेव्हा 21 वर्षाचा होईल तेव्हा तो कोट्याधीश होऊ शकतो. या फार्मूला विषयीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 म्युच्युअल फंड एसआयपी यामध्ये ठरते टर्निंग पॉईंट

तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्याकरिता गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला म्युचल फंडातील गुंतवणूक खूप फायद्याचे ठरू शकते. यामध्ये मोठा निधी उभारण्याकरिता तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी या गुंतवणूक पर्यायाची निवड करू शकतात.

या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची बचत केली तरी देखील एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा करू शकतात. एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रिया असून यामध्ये जर तुम्ही दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो व चक्रवाढीचा फायदा देखील घेता येतो.

दीर्घ मुदतीमध्ये बऱ्याचदा एसआयपी ने 20 टक्क्यांपर्यंत देखील परतावा दिलेला आहे. परंतु तरीदेखील साधारणपणे एसआयपीतील केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा पाहिला तर त्याचा दर 12 ते 16 टक्क्यांपर्यंत आहे. जो चक्रवाढीसह मोठा निधी जमा करण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो.

21×10×12 चा फार्मूला नेमका कसा काम करतो?

हा फॉर्मुला मुलांच्या उज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाचा असून या फार्मूल्यानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे मूल वयाच्या 21व्या वर्षी दोन कोटी रुपये जमा करू शकते. जर हा फॉर्मुला बघितला तर यातील 21 या अंकाचा अर्थ असा आहे की तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 21 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.

यातील दहा या अंकाचा अर्थ पाहिला तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल. तसेच या फॉर्मुल्यातील जर तुम्ही 12 या अंकाच्या अर्थ पाहिला तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% परतावा मिळाला तर तुमच्या मुलासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तुम्हाला जमा करता येतो.

 एसआयपी कॅल्क्युलेटर द्वारे पहा या फॉर्मुल्याचे गणित

एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार जर आपण या फार्मूल्याचे गणित समजले तर यामध्ये मूल जेव्हा जन्माला येते तेव्हाच त्याच्या पालकांनी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची  एसआयपी सुरू करणे गरजेचे राहिल आणि ती 21 वर्षे सुरू ठेवावी लागेल.

21 वर्षाच्या कालावधीत तुम्ही एकूण 25 लाख वीस हजार रुपये इतकी रक्कम गुंतवाल. या कालावधीमध्ये जर 12 टक्क्यांचा परतावा मिळाला तर तुमचे मुल कोट्याधीश होईल.या कालावधीत त्याच्यासाठी जमा केलेल्या निधी एकूण एक कोटी तेरा लाख 86 हजार 742 रुपये इतका असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe