State Bank Of India FD News : प्रत्येक जण आपल्याकडील पैसा वाढावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट ला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. फिक्स डिपॉझिट मध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात.
एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळते. अलीकडे इतर सामान्य ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवत आहेत.

बँकांच्या माध्यमातून फिक्स डिपॉझिट वर चांगला परतावा दिला जात असल्याने यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या चारशे दिवसांच्या विशेष एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना ठरणार फायदेशीर
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी चारशे दिवसांची विशेष एफडी योजना राबवत आहे. याला अमृतकलश एफडी योजना म्हणून ओळखले जात आहे. ही विशेष योजना ग्राहकांना जबरदस्त परतावा देते.
कमीत कमी दिवसात अधिकचा परतावा हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून 7.10% या दराने परतावा दिला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचा परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अमृत कलश एफ डी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.60% या दराने परतावा मिळतोय.
म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिकचा परतावा दिला जातोय. अमृत कलश योनेसोबतच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी एक विशेष एफडी योजना ऑफर करत आहे.
याला स्टेट बँकेची अमृत वृष्टी योजना या नावाने ओळखले जात आहे. ही योजना ४४४ दिवसांसाठीची आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना ७.२५ टक्के दराने परतावा दिला जात आहे. पण ही विशेष योजना काही लिमिटेड कालावधीसाठीच सुरू आहे.
या योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. यामुळे जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर या शेवटच्या मुदतीच्या आतच गुंतवणूक करावी लागणार आहे.