नगर शहर विधानसभा मतदारसंघाची लढत निश्चित ; सुवर्णा कोतकर यांची माघार, महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी !

Tejas B Shelar
Published:
Nagar Politics

Nagar Politics : विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील लढती फायनल झाल्या आहेत. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील हे आज फायनल झाले आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यामुळे आता सर्वच मतदारसंघातील चित्र क्लिअर झाले आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे.

या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. खरंतर या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप हे पुन्हा एकदा उमेदवारी करणार आहेत.

महाविकास आघाडी कडून या जागेवर शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आलीये. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र सुवर्णा कोतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

महाविकास आघाडीचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सुद्धा या जागेवर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता, मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी देखील आपला अर्ज मागे घेतला आहे.

या मतदार संघात एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण, या जागेवर तीन प्रमुख नेत्यांमध्ये लढत होणार आहे, अर्थात तिरंगी लढत होणार आहे.

या विधानसभा मतदारसंघात एकूण 24 लोकांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण यापैकी 10 लोकांनी माघार घेतली असून आता फक्त 14 लोक रिंगणात राहणार आहेत.

या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार असे वाटत असताना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षातील शशिकांत गाडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असल्याने इथे तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

यामुळे या तिरंगी लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे. दरम्यान शशिकांत गाडे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो असेही मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

खरंतर कोतकर कुटुंबीयांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यासाठी त्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती देखील केली जात होती. कोतकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.

नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी सुवर्णा कोतकर यांनी अर्ज देखील भरला होता. पण ऐनवेळी सुवर्णा कोतकर यांनी अर्ज मागे घेतलाय.

महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी शरद पवार गटासमवेतच ठाकरे गट देखील उत्सुक होता. ही जागा ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती.

शिवसेनेच्या फुलसौंदर, बोराटे आणि गाडी यांनी अपक्ष अर्ज सुद्धा भरला होता. मात्र यापैकी गाडे यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. उर्वरित दोघांनी मात्र आपला अर्ज मागे घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe