Ahilyanagar News:- राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आज अर्ज माघारीची तारीख होती व आज जवळपास राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये लढती निश्चित झालेल्या आहेत.ह्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून बंडखोरांना थंड करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले व बऱ्याच ठिकाणी यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर मात्र अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ हा आमदार संग्राम जगताप त्यांच्या संबंधित असलेल्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने संग्राम जगताप यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला की काय? असे म्हणायला या निमित्ताने वाव आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात गांधी कुटुंबीय नोंदवणार सक्रिय सहभाग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर शहरांमधून अजित पवार गटाकडून मैदानामध्ये आमदार संग्राम जगताप असून त्यांनी प्रचारामध्ये वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे.
आज आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व या निवडणुकीत आमदार जगतापांच्या प्रचारासह सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये गांधी कुटुंबीय सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
त्यामुळे नक्कीच संग्राम जगताप यांची ताकद या निवडणुकीच्या निमित्ताने वाढेल हे मात्र निश्चित. ह्या भेटी वेळी भाजप नेते सुवेंद्र गांधी, स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी तसेच दीप्तीताई गांधी, देवेंद्र गांधी, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले व या निवडणुकीत संपूर्ण गांधी कुटुंब एक निष्ठेने जगताप यांची साथ देईल असं गांधी कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणात गांधी परिवाराचा मोठा सहभाग असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा असल्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आमदार संग्राम जगताप यांना होईल. अहिल्या नगर शहरांमध्ये घडलेली ही घटना एक मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
सरोज गांधी यांनी काय म्हटले?
संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांनी मागील दहा वर्षांमध्ये शहराचा मोठा विकास केला आहे. आम्ही सर्व गांधी परिवार त्यांच्यासोबत असून या निवडणुकीत संग्राम जगताप हेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांनी दिली.
जसजशी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जवळ येत आहे तसातसा अहिल्यानगर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे आपल्याला यानिमित्ताने दिसून येत आहे. गांधी कुटुंबाने संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्यामुळे आता अहिल्या नगर शहरांमध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची ताकद आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे.