PM Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्रातील सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांसाठी केंद्राकडून शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असतो. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलापासून मुक्ती मिळावी या अनुषंगाने केंद्रातील सरकारने पी एम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा देशभरातील एक कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
याच्या माध्यमातून पात्र कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळू शकणार आहे. दरम्यान आज आपण या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना किती दिवसात अनुदानाची रक्कम मिळते आणि किती अनुदान मिळते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा सखोल असा प्रयत्न करणार आहोत.
किती अनुदान मिळते
मिळालेल्या माहितीनुसार पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी कमाल 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
या अंतर्गत एक किलोवॅट क्षमता असणारे सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी नागरिकांना तीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
तसेच दोन किलो वॅट क्षमता असणारे सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 60 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शिवाय तीन किलो वॅट क्षमता असणारे सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना कमाल 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
किती दिवसात अनुदानाचा पैसा बँक खात्यात जमा होतो
केंद्रातील सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पात्र असल्याचे आढळल्यास सरकार तुम्हाला तुमच्या खात्याचे तपशील विचारेल,
ज्यामध्ये तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर मग अनुदान मिळण्याच्या प्रक्रियेला 30 दिवस लागू शकतात. एकंदरीत 30 ते 45 दिवसांच्या कालावधीत या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकते.