Nagpur To Goa Special Train : देशात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. मोठ्या आनंदात आणि उत्साहात दीपोत्सवाचा सण साजरा झाला असून दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या गेल्या होत्या.
यातील काही गाड्या अजूनही सुरू आहेत. नागपूर ते गोवा दरम्यानही दिवाळीच्या काळात विशेष ट्रेन चालवण्यात आली होती.

दरम्यान नागपूर ते गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही ही नागपूर ते गोवा असा प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
या विशेष गाडीच्या रेल्वे सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला गेला असून यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ट्रेन क्रमांक 01139 नागपूर-मडगाव स्पेशल एक्स्प्रेस ही आधी 28 सप्टेंबरपर्यंत धावणार होती,
मात्र या गाडीला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याने ही गाडी आता 28 डिसेंबरपर्यंत चालवली जाणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01140 मडगाव-नागपूर स्पेशल एक्स्प्रेस ही ट्रेन सुद्धा आधी 29 सप्टेंबरपर्यंत धावणार होती, मात्र या गाडीलाही मुदत वाढ देण्यात आली आहे आणि आता ही गाडी 29 डिसेंबरपर्यंत चालवण्यात येणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ही विशेष गाडी द्वि साप्ताहिक आहे म्हणजेच आठवड्यातून दोनदा धावणार आहे. नागपूरहून ही विशेष गाडी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मंगळवार आणि रविवारी चालवली जाणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी गोवा राज्यातील मडगाव रेल्वे स्टेशन वरून दर बुधवार आणि शनिवारी चालवली जाणार आहे. या विशेष गाड्यांना आता मुदतवाढ देण्यात आली असल्याने
नागपूरहुन गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रवाशांच्या माध्यमातूनही रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
या ट्रेनला मिळालेल्या मुदतवाढीमुळे अधिक लोकांना प्रवास करता येईल आणि गर्दी कमी होणार आहे. नागपूर आणि गोवा दरम्यान प्रवाशांसाठी आरामदायी आणि सुलभ प्रवास सुनिश्चित करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.