‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात प्रचंड स्वाभिमानी, स्वाभिमानाला तडा न जाऊ देता कमवतात बक्कळ पैसा !

व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक निघत असतो आणि हाच मुळांक व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे सांगत असतो. एवढेच नाही तर मुलांक व्यक्तीचा भूत, भविष्य आणि वर्तमान काळ सांगण्यास सक्षम आहे. दरम्यान आज आपण मुलांक तीन असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तसेच त्यांच्या भविष्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. व्यक्तीच्या केवळ जन्म तारखेवरून त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणून घेता येऊ शकतो, असे अंकशास्त्र सांगते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक निघत असतो आणि हाच मुळांक व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे सांगत असतो.

एवढेच नाही तर मुलांक व्यक्तीचा भूत, भविष्य आणि वर्तमान काळ सांगण्यास सक्षम आहे. दरम्यान आज आपण मुलांक तीन असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तसेच त्यांच्या भविष्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांक तीन म्हणजे असे लोक ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झालेला असतो.

मुलांक कसा काढतात?

अंकशास्त्रानुसार मुलांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेवरून निघतो. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जात असतो. हा मुळांक नेहमी एक ते नऊ दरम्यान असतो. अर्थातच ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 12 तारखेला झालेला असतो त्यांचा मूळांक 1+2 = 3 असतो.

मुलांक 3 असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व

मुलांक 3 असणारे लोक खूपच स्वाभिमानी स्वभावाचे असतात. त्या लोकांचा स्वाभिमानी स्वभाव त्यांना कुणाच्याही समोर झुकू देत नाही. कुणाच्याही समोर हात न पसरता, कुणाच्याही समोर न झुकता हे लोक यशाची प्राप्ती करतात. यशाच्या गिरी शिखरावर पोहोचण्यासाठी हे लोक कोणाच्याच कुबड्यांचा वापर करत नाहीत.

या लोकांना विज्ञान आणि साहित्यांमध्ये विशेष आवड असते. हे लोक अभ्यासातही भरपूर हुशार असतात. मात्र या लोकांना गर्दी आवडत नाही. शांत वातावरणात राहणे या लोकांना विशेष प्रिय असते. कुणी येऊन यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करावी हे या लोकांना सहन होत नाही, असे केल्यास हे लोक प्रचंड चिडतात, रागवतात.

हे लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि मनाप्रमाणे जगतात. हे लोक प्रचंड मेहनती आणि धाडसी स्वभावाचे. आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि धाडसाच्या जोरावर हे लोक त्यांना हवं ते अचिव्ह करतात. हे लोक कोणतेही काम खूपचं मनापासून करतात.

हे लोक ज्या गोष्टी ठरवतात, ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडत नाही. या लोकांना सुरुवातीच्या काळात पैशांच्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र नंतर या लोकांकडे भरपूर पैसा येतो. या लोकांचा एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की हे लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे या लोकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe