बँक ऑफ बडोदाकडून 33 लाखांचे Home Loan 15 वर्षांसाठी मंजूर झालेत तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? वाचा….

अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे काही अंशी फायदेशीर देखील ठरते. एसबीआय एचडीएफसी आयसीआयसीआय बँक ऑफ बडोदा सारख्या प्रमुख बँका ग्राहकांना किमान इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज देतात.

Published on -

Bank Of Baroda Home Loan News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. खरेतर बँक ऑफ बडोदा ही आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना होम लोन देखील पुरवले जात आहे. परवडणाऱ्या व्याजदरात सर्वसामान्य ग्राहकांना बँक ऑफ बडोदा कडून गृहकर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदाच्या होम लोनची माहिती जाणून घेणार आहोत.

Bank Of Baroda चे गृहकर्ज

अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. घरांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे काही अंशी फायदेशीर देखील ठरते.

एसबीआय एचडीएफसी आयसीआयसीआय बँक ऑफ बडोदा सारख्या प्रमुख बँका ग्राहकांना किमान इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज देतात. यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न सहजचं पूर्ण होते.

दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदा चे गृह कर्जासाठी चे व्याजदर? पाहणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा सध्या 8.40 टक्के या किमान व्याजदरात सर्वसामान्य ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देत आहे.

मात्र या किमान व्याज दरात फक्त अशाच ग्राहकांना होम लोन दिले जाते ज्या लोकांचा सिबिल स्कोर स्ट्रॉंग आहे. आठशेच्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदा कडून 8.40% या इंटरेस्ट रेटवर कर्ज दिले जाते.

33 लाखांचे होम लोन मंजूर झाल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार

बँक ऑफ बडोदा कडून जर 8.40 टक्के या व्याज दरात 33 लाख रुपयांचे गृह कर्ज पंधरा वर्षे कालावधीसाठी मंजूर झाले तर 32 हजार 303 रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. अर्थातच या कालावधीत सदर कर्जदार व्यक्तीला 58 लाख 14 हजार 540 रुपये भरावी लागणार आहे.

अर्थातच सदर कर्जदाराला 25 लाख 14 हजार 540 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.
जर समजा 33 लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्ष कालावधीसाठी 8.40% मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 28 हजार 430 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

अर्थातच अशा प्रकरणात सदर व्यक्तीला 68 लाख 23 हजार दोनशे रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच या काळात 35 लाख 23 हजार दोनशे रुपये व्याज म्हणून बँकेकडे जमा करावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe