धार्मिक स्थळे बंद ठेवणे, ही राज्य सरकारची विकृती आहे

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात राज्यभरात भाजपने मंदिर उघडा आंदोलन पुकारलं आहे.

दरम्यान राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते, यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय? असा सवाल माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

तसेच धार्मिकतेचा मुद्दा तापलेला असताना धार्मिक स्थळे बंद ठेवणे, ही राज्य सरकारची विकृती आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

दरम्यान पाटील हे आज नगरला आले असताना यावेळी ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली.

पाटील म्हणाले की, तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेला नाही. कोणाचेच कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. सरकार वाचवण्यात सर्व मग्न आहेत.

जनतेच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजप राज्यात आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment