मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी मध्य रेल्वे मार्गावर धावणार विशेष लोकल, विशेष लोकलचे वेळापत्रक कसे राहणार ?

मध्य रेल्वेने निवडणूकीच्या दिवशी मुंबईकरांसाठी विशेष लोकल चालवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. रात्र कालीन विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून हाती येत आहे. सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या धीम्या मार्गावर या विशेष लोकल गाड्या उशिरा चालवल्या जाणार आहेत.

Published on -

Mumbai Local Railway News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तसेच 23 तारखेला मतदानाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहे.

दरम्यान, याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मुंबईकरांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील नागरिकांसाठी लोकल लाईफ लाईन आहे. मुंबईकर प्रवासासाठी लोकलला प्राधान्य दाखवतात. यामुळे मध्य रेल्वेने निवडणूकीच्या दिवशी मुंबईकरांसाठी विशेष लोकल चालवण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

रात्र कालीन विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून हाती येत आहे. सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या धीम्या मार्गावर या विशेष लोकल गाड्या उशिरा चालवल्या जाणार आहेत.

खरं तर निवडणुकीच्या दिवशी निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी, त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन यंदा केले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या लोकांसाठी मध्य रेल्वेने उशिरापर्यंत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या कल्याण आणि पनवेल या धिम्या मार्गावर धावणार असल्याने याचा या संबंधित नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होईल अशी आशा आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण 20 नोव्हेंबर रोजी धावणाऱ्या या विशेष लोकल गाड्यांचे वेळापत्रक कसे आहे या गाड्या किती वाजता सुटणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार विशेष लोकल गाड्यांचे वेळापत्रक?

मध्य रेल्वे प्रशासनाकडून हाती आलेल्या माहितीनुसार डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण ही विशेष लोकल 1.10, 2.30 ला सोडली जाणार आहे. तसेच, सीएसएमटी-पनवेल ही लोकल 1.40, 2.50 ला सोडली जाणार आहे. अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी ही गाडी 1.00, 2.00 ला सोडली जाईल अन पनवेल-सीएसएमटी गाडी 1.00, 2.30 ला सोडली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News