वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत गुड न्यूज ! ‘या’ शहरातून राजधानी दिल्लीसाठी सुरू होणार Vande Bharat Sleeper, हालचाली वाढल्यात

येत्या काही महिन्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावताना दिसेल असा दावा रेल्वे मंत्र्यांकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी दिल्लीला मिळणार. दिल्ली ते श्रीनगर दरम्यान स्लीपर ट्रेन सुरू होणार अशी बातमी आता समोर येत आहे.

Tejas B Shelar
Published:
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरात राज्याला मिळाली. गुजरात मधील अहमदाबाद ते भुजदरम्यान भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू झाली असून या गाडीला तेथील प्रवाशांकडून चांगला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

वंदे भारत मेट्रो ट्रेन चा मान गुजरात राज्याला मिळाल्यानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन चा मान कोणत्या राज्याला मिळणार ? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खरतर वंदे भारत एक्सप्रेस वंदे भारत मेट्रो आणि त्यानंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे.

येत्या काही महिन्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावताना दिसेल असा दावा रेल्वे मंत्र्यांकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी दिल्लीला मिळणार. दिल्ली ते श्रीनगर दरम्यान स्लीपर ट्रेन सुरू होणार अशी बातमी आता समोर येत आहे.

असे झाल्यास या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना या गाडीचा फायदा होईल आणि दिल्ली ते श्रीनगर हा प्रवास जलद होईल अशी आशा या निमित्ताने प्रवासी संघटनांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाडीचे वेळापत्रक कसे राहील, ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते, तसेच ही गाडी प्रत्यक्षात रुळावर कधीपासून धावणार यासंदर्भात ही आता एक नवीन अपडेट समोर आले आहे.

कधीपासून धावणार दिल्ली श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन

प्रादेशिक संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारतीय रेल्वे राष्ट्रीय राजधानी आणि जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. भारतीय रेल्वेने या प्रदेशात प्रवेश सुधारण्याच्या उद्देशाने बारामुल्लापर्यंत मार्गाचा विस्तार करण्याची योजना देखील आखली आहे.

वंदे भारत स्लीपर जानेवारी 2025 मध्ये ऑपरेशन सुरू करेल. विशेष म्हणजे ही गाडी सुरू झाल्यानंतर दिल्ली ते श्रीनगर हे 800 km पेक्षा अधिकचे अंतर अवघ्या 13 तासात कापले जाणार असून प्रवाशांना या गाडीमुळे अगदीच आरामदायी प्रवास करता येणार आहे.

सध्या ज्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत त्या चेअर कार प्रकारातील असून या गाडीमधून फक्त बसून प्रवास करता येतो मात्र स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी फायद्याची ठरणार अन या गाडीमुळे लांबचा प्रवास देखील कंटाळवाणा वाटणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

श्रीनगर दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन चे वेळापत्रक कसे राहील?

मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी नवी दिल्लीहून संध्याकाळी 7:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता श्रीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी अंबाला कैंट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठूआ, जम्मू तवी या मार्गे पुढे श्रीनगर पर्यंत जाणार आहे. भविष्यात या गाडीचा विस्तार देखील शक्य आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

ही गाडी या मार्गावरील अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहाल या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तिकिट दर कसे असणार?

या गाडीच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर राजधानी एक्सप्रेस प्रमाणेच या गाडीचे तिकीट दर राहतील. या गाडीचे तिकीट दर हे दोन हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe