शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्याचे बाजार भाव लवकरच दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर जाणार, कारण काय?

बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याचा जुना साठा आता संपुष्टात येत आहे. दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक देखील फारच मर्यादित आहेत. पावसाळी कांदा पिकांवर खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. खरीप हंगामातील हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट आली असल्याने सध्या कांद्याचे दर तेजीत आले आहेत.

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा 70 ते 80 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता. मात्र या चालू आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे बाजार भाव तब्बल 100 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.

यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे स्वयंपाक घरातील बजेट आता वाढले आहे. स्वयंपाक घरातील बजेट कोलमडल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींमध्ये सरकार विरोधात नाराजी देखील वाढत आहे. दुसरीकडे कांद्याचे दर घाऊक बाजारात देखील वाढले असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय.

बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांद्याचा जुना साठा आता संपुष्टात येत आहे. दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक देखील फारच मर्यादित आहेत. पावसाळी कांदा पिकांवर खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

खरीप हंगामातील हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट आली असल्याने सध्या कांद्याचे दर तेजीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय परंतु खरीप हंगामातील कांदा उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च सुद्धा करावा लागलाय.

यामुळे या वाढीव बाजारभावातून फक्त शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून काढता येणार आहे. या वाढीव बाजारभावाचा फारच मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाच्या काही धोरणामुळे देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळतोय.

आधी शासनाने कांदा निर्यातीसाठी निर्यात शुल्क लावले होते. पण आता हे निर्यात शुल्क कमी करण्यात आले आहे. एवढेच नाही तर कांद्यासाठी लागू असणारे किमान निर्यात मूल्य देखील हटवण्यात आले आहे.

याचा परिणाम हा बाजारभावावर दिसतोय. त्यामुळे सध्या कांद्याचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी बाजार भाव देखील चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान नमूद केले जात आहेत.

विशेष बाब अशी की काही तज्ञांनी आगामी काळात बाजार भाव आणखी वाढणार असे आशा व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांनी कांद्याचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील असे म्हटले जात आहे. तथापि आगामी काळात कांद्याचे दर खरच दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe