‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात भाग्यवान ! बिजनेसमधून कमावतात मोठा पैसा, तुमची जन्मतारीख आहे का यात ?

Tejas B Shelar
Published:
Numerology Secrets

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगितले जाऊ शकते असा दावा अंकशास्त्रात केला जातो. फक्त एका जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व अधोरेखित होत असते.

अंकशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांचा मूळांक काढला जात असतो आणि याच मुळांकावरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सांगितले जाऊ शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुळांक निघत असतो.

उदाहरणार्थ कोणत्याही महिन्याच्या 11 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा दोन असतो. दरम्यान आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या मुलांकाचे लोक बिजनेस मधून मोठा पैसा कमावतात.

या लोकांना नेहमीच नशिबाची साथ मिळते. 5 मुळांक असणारे लोक खूपच भाग्यशाली ठरतात. कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा पाच असतो.

या लोकांचा स्वामीग्रह हा बुध असतो. यामुळे या लोकांची बुद्धी ही फारच ब्राईट असते. हे लोक बुद्धिमान असतात आणि आपल्या बुद्धीच्या जोरावरच अपार पैसा कमावतात. हे लोक व्यवसायात मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात आणि व्यवसायातून यांना मोठा पैसा मिळत असतो.

फक्त व्यवसायच नाही तर इतरही क्षेत्रात हे लोक यशस्वी होतात आणि समाजात आपले एक मोठे नाव बनवतात. 5 मुलांक असणारे लोक खूप धाडसी असतात आणि आव्हानांना तोंड देण्यास कधीही घाबरत नाहीत. त्यांच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी ते नेहमी खंबीरपणे उभे असतात.

या लोकांना जोखीम घेणे आवडते. ते नवनवीन जोखीम घेत राहतात आणि त्यांचे जीवन नेहमीच साहसाने भरलेले असते. त्यांनी व्यवसाय केला तर त्यांना भरपूर यश मिळते. ते योजना बनवण्यात तज्ञ आहेत आणि फायदे देखील मिळवतात.

या लोकांवर बुद्धीचे देवता श्री गणेशाची विशेष कृपा असते. गणरायाच्या कृपेने हे लोक उच्च शिक्षा घेतात आणि उच्च शिक्षित असल्याने हे प्रत्येकच क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादामुळे या लोकांना उच्च शिक्षण मिळते ज्यामुळे त्यांना भविष्यात यश मिळण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe