7th Pay Commission : 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 23 तारखेला म्हणजेच उद्या होणार आहे. उद्या मतमोजणी झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे चित्र क्लिअर होणार आहे. सध्या विविध संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत असून यातील काही एक्झिट पोल महाविकास आघाडीला आणि काही एक्झिट पोल महायुतीला बहुमत दाखवत आहेत.
मात्र प्रत्यक्षात 145 चा आकडा कोणती आघाडी गाठणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे निवडणुकीनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. राज्यात नवीन सरकार स्थापित झाले की लगेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊद्या किंवा महायुतीचे, कोणतेही सरकार आले तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढवला जाणार आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला आहे.
ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान आता याच धरतीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% केला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून लवकरच हा भत्ता 53% होणार आहे.
याबाबतचा निर्णय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे म्हटले जात आहे. जे नवीन सरकार येईल ते नवीन सरकार याबाबतचा निर्णय घेणार आहे. तथापि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे.
म्हणजेच या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. एकंदरीत नवीन सरकार कोणाचेही आले तरी देखील राज्य कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.