Maharashtra CNG Rate : दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दोन दिवसातच महागाईचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात सीएनजीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच मोठा फटका बसणार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सीएनजी चे रेट वाढले असल्याने जे लोक सीएनजी कार चालवतात तसेच रिक्षाने प्रवास करतात अशा लोकांना या दरवाढीचा फटका बसणार असून सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे.
इकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे तिकडे रिक्षा युनियनच्या माध्यमातून किलोमीटर मागे दोन ते अडीच रुपयांची भाडे वाढ केली गेली पाहिजे अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. मुंबईमध्ये सीएनजी च्या किमती वाढल्या असून यामुळे मुंबईकरांना याचा मोठा फटका बसणार आहे.
या दरवाढीमुळे मुंबईत ज्या रिक्षा धावतात त्या रिक्षांचे भाडे आता नक्कीच वाढणार आहे. यामुळे मुंबईमध्ये कॅब किंवा रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना आता अधिकचा खर्च करावा लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने 22 नोव्हेंबर पासून सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे.
या नव्या निर्णयानुसार आता सीएनजी चे दर किलोमागे 75 रुपये ऐवजी 77 रुपये एवढे झाले आहेत. राजधानी मुंबईत रिक्षा, टॅक्सी, बस इत्यादी वाहने सीएनजी वर अवलंबून आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक सीएनजी वाहने धावतात. IGL आणि अदानी टोटल गॅससारख्या कंपन्या स्वस्त गॅसच्या पुरवठ्यात दुसऱ्यांदा कपात केल्यानंतर किमती आणखी वाढविण्याचा विचार करत आहेत.
राजधानी मुंबईत आधीपासूनच सीएनजीच्या किमती भडकलेल्या होत्या. आता महानगर गॅस लिमिटाने सीएनजीच्या किमतीत किलोमागे दोन रुपयांची वाढ केलीये. विशेष बाब अशी की आगामी काळात सीएनजीच्या किमती आणखी वाढू शकतात असाही अंदाज आता समोर येतोय.
साहजिकच या साऱ्यांचा मुंबईमधील सीएनजी वाहनधारकांना मोठा फटका बसणार असून जे लोक रिक्षाने प्रवास करतात किंवा इतर सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात त्या लोकांना देखील या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.