मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, कसं राहणार Timetable अन स्टॉपेज ?

मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे भरती मंडळाच्या आरआरबी परीक्षार्थीसाठी रेल्वे विभागाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वेच्या माध्यमातून दहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

Tejas B Shelar
Published:
Mumbai Railway News

Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असून याच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात तसेच इतर सणासुदीच्या काळात रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जातात. या गाड्यांमुळे रेल्वेचा प्रवास हा सोयीचा होतो.

दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे भरती मंडळाच्या आरआरबी परीक्षार्थीसाठी रेल्वे विभागाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वेच्या माध्यमातून दहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांना उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवर देखील थांबा मंजूर करण्यात आला निर्णय रेल्वेने घेतला असून यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

दरम्यान आज आपण मुंबई ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कधीपर्यंत चालवले जाणारे या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महत्त्वाचे म्हणजे खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात देखील आता आपण माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक?

आरआरबी विशेष गाडी २३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत दररोज मुंबई येथून चालवली जाणार आहे. ही गाडी या काळात मुंबई येथून दुपारी ३.३० वाजता आणि नागपूर येथे सकाळी १०.५० वाजता पोहोचणार आहे.

तसेच आरआरबी विशेष गाडी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान दररोज नागपूर येथून सोडली जाणार आहे. ही ट्रेन दुपारी १.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचणार आहे. या गाडीमुळे आरआरबी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नागपूर ते मुंबई अशा पाच आणि मुंबई ते नागपूर अशा पाच म्हणजेच एकूण दहा फेऱ्या या विशेष गाड्यांच्या नियोजित आहेत.

महत्त्वाचे म्हणजे ही विशेष गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe