मृत्यूनंतर मयत व्यक्तीच्या आधार कार्डचे आणि पॅन कार्डचे काय होते ? वाचा सविस्तर

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची तरतूद कुठेच नाहीये. मात्र, मृत्यूनंतर सदर व्यक्तीच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो. यामुळे मयत व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करण्याची तरतूद नसली तरी देखील ते आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा आहे.

Tejas B Shelar
Published:

Aadhar Card And Pan Card News : आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही भारतीय नागरिकांची महत्त्वाची ओळखपत्रे. हे दोन्ही ओळखपत्र भारतीय नागरिकांसाठी फारच महत्त्वाची आहेत. आधार कार्डचा आणि पॅन कार्ड चा उपयोग प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये केला जातो.

तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक असतात.भारतात साधे एक सिम कार्ड जरी काढायची असले तरी देखील आधार कार्ड आवश्यक असते.

सरकारी योजनांसाठी तर आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. इतर काही महत्त्वाची कागदपत्रे काढायची असली तरी देखील आधार कार्ड आवश्यक असते.

शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी मतदान कार्ड साठी अर्ज करण्यासाठी अशा वेगवेगळ्या शासकीय कामांमध्ये आधार कार्डचा उपयोग होतो. पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर बँकिंग कामात पॅन कार्डचा उपयोग होतो याशिवाय इतर वित्तीय कामांमध्ये पॅन कार्ड आवश्यक असते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का शासकीय कामांमध्ये आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते ? नाही ना मग आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नियमानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची तरतूद कुठेच नाहीये. मात्र, मृत्यूनंतर सदर व्यक्तीच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो. यामुळे मयत व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करण्याची तरतूद नसली तरी देखील ते आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा आहे.

यामुळे सदर मयत व्यक्तीच्या आधार कार्ड लॉक करणे हा सर्वात फायद्याचा पर्याय ठरणार आहे. पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर मयत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करण्याबाबतही कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही.

म्हणजेच मयत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करायलाच हवे असे नियम भारतीय आयकर विभागाने तयार केलेले नाहीत. पॅन कार्ड हे बँक आणि डिमॅट खात्यासाठी आवश्यक असते. वित्तीय ठिकाणी पॅन कार्ड चा उपयोग होतो.

यामुळे मयत व्यक्तीचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. या दस्तऐवजांचा वापर करून कोणी फसवणूक करणार नाही याची काळजी मयत व्यक्तीच्या कुटुंबाने घेतली पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe