पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता !

पंजाबराव सांगतात की, चार ते आठ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे नांदेड जत पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर शिर्डी गंगापूर अहिल्यानगर धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे.

या नव्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांकडून समोर आला आहे.

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस होईल. तिकडे तिरुपतीकडे देखील या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लोकांना तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जायचे असेल त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.

दरम्यान, या पावसाळी वातावरणाचा आपल्याकडे देखील प्रभाव पाहायला मिळणार आहे. तिरुपती कडे 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने याचा प्रभाव म्हणून आपल्या महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

एक डिसेंबर नंतर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. दोन डिसेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊसही पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या काळात राज्यातील नांदेड अहमदपूर उदगीर आंबेजोगाई परळी लातूर केज धाराशिव पंढरपूर या भागात अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र तदनंतर राज्यात पावसाची व्याप्ती वाढणार आहे.

चार तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सर्व दूर पाऊस पडणार नाही मात्र काही ठिकाणी पावसाची हजेरी राहील.

पंजाबराव सांगतात की, चार ते आठ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे नांदेड जत पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर शिर्डी गंगापूर अहिल्यानगर धाराशिव या भागात पावसाची शक्यता आहे.

या काळात सर्व दूर पाऊस पडणार नाही मात्र वर सांगितलेल्या भागांमध्ये पावसाची शक्यता असून या अनुषंगाने या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे नियोजित वेळेत आवरून घ्यावीत आणि पावसाचा अंदाज पाहून आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या नव्या अंदाजात दिला आहे.

खरेतर, महाराष्ट्रात आता कुठे कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली होती. दरम्यान, कडाक्याच्या थंडीला सुरुवात होताच राज्यात आता पावसाळी वातावरण पाहायला मिळणार असून या पावसाळी वातावरणामुळे पुन्हा एकदा थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe