Mumbai News : मंडळी तुम्हाला जर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 17 मिनिटात पूर्ण होईल असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार का? कदाचित सध्याची मुंबई अन नवी मुंबईमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीला पाहता तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भविष्यात मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबई आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक क्षेत्रात एक मोठी क्रांती होणार आहे.
मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यानचा प्रवास या सेवेमुळे अवघ्या काही मिनिटात पूर्ण होणार आहे. सध्या रस्ते मार्गाने मुंबईहून नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जायचे असेल तर प्रवाशांना तब्बल एक तासाचा म्हणजे 60 मिनिटांचा वेळ लागतो.
मात्र वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 17 मिनिटात पूर्ण होणार असल्याचा दावा केला जातोय. महत्वाचे म्हणजे या वॉटर टॅक्सी सेवेची घोषणा दस्तूर खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या वॉटर टॅक्सी सेवेची घोषणा केली. ही वॉटर टॅक्सी सेवा ही पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्त अशी राहणार आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा कधीपासून सुरू होणार असा प्रश्न मुंबई आणि नवी मुंबईमधील जनतेच्या माध्यमातून उपस्थित होतोय. दरम्यान, या वॉटर टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा मार्च 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
महत्वाची बाब अशी की, या वॉटर टॅक्सी सेवेसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जेट्टी देखील बांधण्यात आली आहे. खरे तर भारतात आधीचं वॉटर टॅक्सीची सुरुवात झालेली आहे. केरळमध्ये 2020 ला वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली.
खरंतर गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात भारतात रस्ते वाहतुकीच्या क्षेत्रात मोठी नेत्र दीपक अशी कामगिरी करण्यात आली आहे. रेल्वेच्या क्षेत्रात देखील सरकारने दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. हवाई वाहतूक देखील आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे.
रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीसोबतच आता सरकारने जलवाहतुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले असून मुंबईमध्ये जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचा प्रयोग केला जाणार आहे. यामुळे नक्कीच मुंबईमधील वाहतूक कोंडी फुटू शकते असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.