मोठी बातमी ! रेल्वे ‘या’ दिवशी देशातील पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करणार, वाचा संपूर्ण डिटेल्स

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही श्रीनगर आणि नवी दिल्ली दरम्यान चालवली जाईल असा दावा केला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर ही वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. यामुळे दिल्लीहुन काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच काश्मीरहुन राष्ट्रीय राजधानी दिल्लीला जाणाऱ्यांसाठी देखील या गाडीचा फायदा होईल.

Published on -

Indian Railway News : भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही श्रीनगर आणि नवी दिल्ली दरम्यान चालवली जाईल असा दावा केला जात आहे.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर ही वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. यामुळे दिल्लीहुन काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

तसेच काश्मीरहुन राष्ट्रीय राजधानी दिल्लीला जाणाऱ्यांसाठी देखील या गाडीचा फायदा होईल. नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समकालीन सुविधा आहेत आणि ते रात्रभर रेल्वेने प्रवास करताना नवीन बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

ही ट्रेन जानेवारी 2025 मध्ये सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आणि प्रवाशांना अधिक आरामदायी आणि प्रभावी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही स्लीपर ट्रेन सुरु केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही गाडी सुरू होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी मंगळवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) चे जानेवारीमध्ये उद्घाटन करणार आहेत.

ही नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस 800 किलोमीटर लांबीचा प्रवास अवघ्या 13 तासात पूर्ण करणार आहे. नवी दिल्ली आणि श्रीनगरला जोडणारी आगामी वंदे भारत स्लीपर ट्रेन काळजीपूर्वक नियोजित वेळापत्रकाचे पालन करेल अशी अपेक्षा आहे.

वृत्तानुसार ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी ७:०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता श्रीनगरला पोहोचणार आहे. ही गाडी या मार्गांवर अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे घेणार आहे.

अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहाल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.

या गाडीचे तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर AC 3-tier (3A) साठी तिकिटांच्या किमती अंदाजे ₹2,000 पासून, AC 2-tier (2A) साठी ₹2,500 आणि First AC (1A) साठी ₹3,000 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. या गाडीच्या तिकिटाच्या किमती या राजधानी एक्सप्रेस सारख्याच राहतील असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!