पुणे रिंग रोडसंदर्भात मोठी अपडेट! ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार भूसंपादन, बांधकामाचा श्री गणेशा कधी ? वाचा…

पुणे शहरात दोन रिंग रोड विकसित केले जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी एक रिंग रोड तयार केला जाणार आहे. यापैकी राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोडच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Ring Road News

Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रो सुरू झाली आहे. याशिवाय रस्ते मार्ग देखील मजबूत केले जात आहेत.

अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे तसेच रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. एवढेच नाही तर पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पुणे शहरात दोन रिंग रोड विकसित केले जाणार आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी एक रिंग रोड तयार केला जाणार आहे. यापैकी राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोडच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर रिंग रोड साठी नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत. खरे तर, रिंग रोड चे काम दोन भागात विभागले गेले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात रिंग रोडचे काम पूर्ण होणार आहे.

यापैकी पश्चिम भागातील रिंग रोड साठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे संपादन हे जवळपास पूर्ण झाले असून फक्त सात गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे शिल्लक आहेत. तसेच पूर्व भागातील २९ गावांमधील काही जागांचे मोबदल्याची निवाडे शिल्लक राहिलेले आहेत.

म्हणजेच पूर्व आणि पश्चिम भागातील अशा एकूण ३६ गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे अद्याप शिल्लक आहेत. दरम्यान, याच रखडलेल्या कामाला आता गती देण्याचा प्रयत्न होत असून हे निवाडे व शिल्लक राहिलेले भूसंपादन येत्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करावेत अशा सूचना दिवसे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम भागातील रिंग रोड साठी 98% जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे तर पूर्व भागातील रिंग रोड साठी 80% जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. पण, काही गावांतील काही क्षेत्रांचे निवाडे तसेच भूसंपादन अद्याप झालेले नाही.

त्यात पूर्व भागातील मावळ तालुक्यातील ६, पुरंदर आणि खेडमधील प्रत्येकी ५ तसेच हवेली तालुक्यातील १३ गावांमधील निवडक जमिनींचे मोबदल्याचे निवाडे व भूसंपादन रखडले आहे. तसेच पश्चिम भागातील मुळशी, हवेली तालुक्यातील प्रत्येकी 3 आणि भोर तालुक्यातील एका गावातील काही क्षेत्राचे भूसंपादन अद्याप झालेले नाही.

दरम्यान, याच रखडलेल्या कामाला आता गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असून जिल्हाधिकारी महोदयांनी रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे संपादन 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात अशा सूचना यावेळी निर्गमित केल्या आहेत.

अर्थातच पुणे रिंग रोड प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम नव्या वर्षात सुरू होऊ शकते. नवीन वर्षात पुणे रिंग रोडचे काम सुरू व्हावे याच अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला गती देण्याचा प्रयत्न होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe