Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका बसला म्हणून लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात. लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, बळीराजा मोफत वीज योजना अशा असंख्य योजनांची घोषणा राज्यातील महायुती सरकारने केली.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक हिट योजना ठरली. या योजनेच्या जोरावरच पुन्हा एकदा जनतेने महायुतीला सत्तेवर स्थापित केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय.
ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून आत्तापर्यंत या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे सुद्धा देण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता महिलांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे.
सरकारने मागील पाच महिन्यांच्या हफ्त्याची रक्कम म्हणजेच एका महिलेला 7500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे. दरम्यान, महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती.
महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रचार सभांमध्ये ही घोषणा केली होती. दरम्यान, महायुती मध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहुमत दिले असल्याने आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे.
यामुळे आता या योजनेसंदर्भात विचारणा होऊ लागली आहे. आता महिलांकडून दरमहा 2,100 रुपये मिळणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या योजने संदर्भात मोठी माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणालेत की, ज्या महिला पात्र आहेत.
त्यांना आता नेहमीप्रमाणे पैसे मिळतील. मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर जे पहिल अधिवेशन होईल त्यात 1500 रुपयांचे 2100 करण्यासंदर्भातचा सरकारचा मनोदय आहे, असे मोठे विधान केले आहे. एकंदरीत महायुतीचे नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत.
तर काही मीडिया रिपोर्ट मध्ये एप्रिल 2025 पासूनचं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे पैसे नेमके कधी वाढणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.