Mumbai Pune Expressway News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. खरेतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा देशातील पहिला हायस्पीड एक्सप्रेस वे आहे. 1999 मध्ये या एक्सप्रेसवेचा एक भाग लोकांसाठी खुला करण्यात आला होता. पुढे वर्ष 2002 मध्ये हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून हा द्रुतगती मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी द्रुतगती मार्गाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. द्रुतगती मार्ग मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एक्स्प्रेस वेवर 1630 कोटी रुपये खर्च करण्यात आला. एक्स्प्रेस वे नवी मुंबईजवळील कळंबोली येथून सुरू होतो आणि तो पुणे शहरातील किवळेपर्यंत जातो. हा एक्स्प्रेस वे 94.5 किमी लांबीचा भारतातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून ओळखला जातो.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) विकसित केला आहे. हा एक्स्प्रेस वे प्रवाशांसाठी फायदेशीर आहे. या एक्सप्रेस वे मुळे प्रवासाचा वेळ तीन तासांवरून एका तासावर आलाय.
पण हा देशातील सर्वाधिक महागडा महामार्ग आहे. या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचा टोल द्यावा लागत आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत या महामार्गाचे टोल दर प्रति किलोमीटर एक रुपयांनी जास्त असल्याचा दावा केला जातो.
आता आपण या महामार्गाच्या टोल दराबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक्स्प्रेस वेचा टोल दरवर्षी ६% वाढतो आणि प्रत्येक तीन वर्षांनी १८% वाढत आहे. गेल्या वर्षी टोलची रक्कम 270 रुपयांवरून 320 रुपये करण्यात आली होती.
याशिवाय मिनी बस आणि टेम्पोसारख्या वाहनांसाठी टोलची रक्कम 420 रुपयांवरून 495 रुपये करण्यात आली होती. सध्या टू-एक्सल वाहनांसाठी टोलची रक्कम 685 रुपये झाली आहे जी पूर्वी 585 रुपये होती.
बसेस आधी 787 रुपये टोल म्हणून भरत होत्या पण आता त्यांना 940 रुपये द्यावे लागत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या महामार्गाच्या टोलचा किमती आता 2026 मध्ये बदलणार आहेत. 2026 मध्ये या किमती चेंज झाल्यात की पुढे 2030 पर्यंत कायम राहणार आहेत.