लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार, ‘या’ तारखेला मिळणार पैसे

डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. खरे तर, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आमचे सरकार आल्यास 2100 रुपये देऊ असे म्हटले होते.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते. दरम्यान, आता निवडणूक संपली असून आज राज्यात नवीन सरकार स्थापित होणार आहे.

आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्त्याचे पैसे खात्यात वर्ग होणार आहेत.

पण, डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. खरे तर, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आमचे सरकार आल्यास 2100 रुपये देऊ असे म्हटले होते.

यामुळे पुढील हप्त्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की 2100 रुपये हा मोठा प्रश्न आहे. तथापि लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच म्हणजेच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच प्रतिमहा 2100 रुपये मिळणार आहेत.

अशातच आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाणार अशी माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

ज्याप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा झाले होते त्याच धर्तीवर आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की मकर संक्रांतीच्या आधीच हा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण यंदा आनंदात साजरा होणार आहे. मकर संक्रांति 14 जानेवारीला असते.

दरम्यान या सणाच्या आधीच म्हणजे 14 जानेवारीच्या आधीच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe