Upcoming Car : SUV कारची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. भारतात देखील एसयुव्ही कारची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या देशात अलीकडील काही वर्षांमध्ये हॅचबॅक, सेडान आणि इतर प्रकारांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. आपल्याकडील रस्ते आणि इतर कारणांमुळे SUV च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक मोठमोठ्या ऑटो कंपनी आता SUV कार निर्मितीवर फोकस करत आहेत. 2025 मध्ये देखील अनेक दिग्गज ऑटो कंपन्या नवनवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहेत.
2024 हे SUV कारच्या बाबतीत उत्तम वर्ष राहिले. या चालू वर्षात एसयुव्ही कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. तथापि, अनेक SUV ज्या 2024 मध्ये लॉन्च होणार होत्या त्या अजून मार्केटमध्ये आलेल्या नाहीत. पण आता या SUV च्या 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण 2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या 9 एसयूव्हीची माहिती पाहणार आहोत.
1) महिंद्रा XUV3XO EV : इलेक्ट्रिक कार ची वाढती मागणी पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा या लोकप्रिय ऑटो कंपनीने BE 6 आणि XEV 9e या दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यात. महत्वाचे म्हणजे आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग व्हावा यासाठी आता महिंद्रा कंपनी लवकरच XUV3XO EV ही नवीन SUV लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही नवीन गाडी XUV400 ची जागा घेईल आणि त्याची ICE समकक्ष म्हणून लांबी 4 m असेल. या गाडीत XUV400 सारखाच बॅटरी पॅक आणि मोटर पर्याय असण्याची शक्यता आहे.
2)एमजी ग्लोस्टर : एमजी लवकरच एक नवीन SUV लॉंच करणार असे बोलले जात आहे. कंपनी नवीन एमजी ग्लोस्टर लॉन्च करण्याच्या तयारीत असून ही मोठी SUV टोयोटा फॉर्च्युनरसोबत स्पर्धा करणार आहे. ही गाडी जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या मॅक्सस टेरिटरीसारखे दिसते. एक ऑफ रोडर गाडी असेल. या गाडीत तीन लॉकिंग डिफ, 4X4 ट्रान्सफर केस, एक लॅडर-फ्रेम चेसिस आणि 213 bhp आणि 478.5 Nm पर्यंतचे आठ स्पीड गेअर बॉक्स असणारे ट्विन-टर्बो डिझेल इंजिन असेल.
3)Hyundai Creta EV : भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Hyundai Creta ची इलेक्ट्रिक आवृत्ती जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होणार अशी बातमी समोर आली आहे. यामध्ये Ioniq रेंजपासून प्रेरित असलेली नवीन इंटिरियर थीम असेल. ह्युंदाई लोगो आणि स्टीयरिंग कॉलम माउंटेड गियर लीव्हरच्या जागी स्टीयरिंग व्हीलवरील क्वाड-डॉट्स असे बदल या गाडीमध्ये पाहायला मिळतील. यात सिंगल-मोटर FWD आर्किटेक्चर असेल. ही गाडी एका चार्जवर सुमारे 500 किमी पर्यंत धावणार असा दावा केला जातोय.
4)टाटा हॅरियर ईव्ही : टाटा ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी असून इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये या कंपनीचा बोलबाला आहे. दरम्यान कंपनी आपला इलेक्ट्रिक सेगमेंट आणखी स्ट्रॉंग बनवण्याच्या विचारात असून याच अनुषंगाने कंपनी हॅरियर ईव्ही लॉन्च करणार आहे. ही गाडी 2025 मध्ये लॉन्च होणार असे बोलले जात आहे. या ईव्हीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असतील जे की ग्राहकांना आकर्षित करू शकतात.
5)टाटा सफारी ईव्ही : भारताच्या इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा 70 टक्के वाटा आहे. दरम्यान कंपनी आता आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनी पुढल्या वर्षी सफारी ईव्ही लॉन्च करणार आहे.
6) आणि 7) मारुती सुझुकी ईविटारा आणि टोयोटा अर्बन क्रॉसओवर : सुझुकी आणि टोयोटाची भागीदारी ICE वाहनांपासून आता EV पर्यंत विस्तारणार आहे. eVitara हे सुझुकीचे पहिले इलेक्ट्रिक वाहन राहणार आहे आणि ते टोयोटाचे समकक्ष असेल ज्याला अर्बन क्रॉसओव्हर म्हटले जाऊ शकते. मारुतीच्या गुजरात प्लांटमध्ये या गाड्यांचे उत्पादन लवकरच सुरू होईल. या गाड्यांचे 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये अनावरण होईल आणि 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. मोठी बॅटरी, ड्युअल मोटर सेटअप ही या गाड्यांचे उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहे.
8)महिंद्रा XEV 7e : महिंद्रा कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. XEV 7e असे या नव्या गाडीचे नाव राहणार आहे. या गाडीची BE 6 आणि XEV 9e इलेक्ट्रिक ओरिजिन SUV सोबत चाचणी सुरु होती. मात्र BE 6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्यानंतरही कंपनीने महिंद्रा XEV 7e कार लाँच केली नाही. पण पुढल्या वर्षी गाडी लॉन्च होणार आहे. ही मूलत: INGLO प्लॅटफॉर्मवर आधारलेली XUV700 ची इलेक्ट्रिक आवृत्ती असेल. या गाडीत 3ऱ्या रांगेत आसन, 2ऱ्या रांगेत कॅप्टन चेअर पर्याय आणि XEV 9e सारखाच तिहेरी स्क्रीन डॅशबोर्ड असेल. XEV 7e ला 4WD क्षमतेसाठी ड्युअल मोटर सेटअप मिळणार आहे.
9)किया सिरोस : Kia नवीन Syros SUV चे 19 डिसेंबरला अनावरण करणार असा दावा होतोय. तसेच ही गाडी 2025 च्या सुरुवातीस शोरूममध्ये येणार आहे. यात एक अनोखी डिझाईन लँग्वेज असेल. याची साइड प्रोफाईल आपल्याला Hyundai Casper ची आठवण करून देणार आहे. या गाडीचे इंटिरियर डिझाइन नवीन राहणार आहे. या गाडीचे बिट K4 सेडानसारखे असेल. सायरोसचा आकार आणि पॉवरट्रेन अद्याप समोर आलेले नाही.