जानेवारी ते डिसेंबर कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेले लोक फारच जिद्दी असतात ! हवी ती गोष्ट मिळवतात, पहा….

व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघत असतो. समजा एखाद्याची जन्मतारीख 11 आहे तर अशा व्यक्तीचा मुलांक दोन राहणार आहे. 1+1 = 2 अशा पद्धतीने कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक दोन राहील. अंकशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार मूळांक तीन असणारे लोक फारच जिद्दी असतात.

Tejas B Shelar
Published:

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग असून अंकशास्त्रात अंकांना फार महत्त्व आहे. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य अधोरेखित होऊ शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक काढला जातो आणि हाच मुळांक व्यक्तीचे भविष्य सुद्धा सांगू शकतो असा दावा अंकशास्त्रात होतो. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघत असतो.

समजा एखाद्याची जन्मतारीख 11 आहे तर अशा व्यक्तीचा मुलांक दोन राहणार आहे. 1+1 = 2 अशा पद्धतीने कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक दोन राहील. अंकशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार मूळांक तीन असणारे लोक फारच जिद्दी असतात. दरम्यान आज आपण मुळांक तीन लोकांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणाचा मुळांक तीन असतो

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या तीन, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक तीन असतो. जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांपैकी कोणत्याही महिन्याच्या वर नमूद केलेल्या तारखांना ज्या लोकांचा जन्म होतो त्या लोकांचा मुळांक म्हणजेच मूळ अंक तीन असतो. हा मुळांक व्यक्तीचे संपूर्ण भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगतो. आता आपण मूळांक तीन असणाऱ्या लोकांबाबत माहिती पाहुयात.

कसा असतो स्वभाव अन व्यक्तिमत्व

हे लोक स्वातंत्र विचाराचे असतात. यामुळेच या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जिद्दीपणा असतो. हे लोक जिद्दीने यशाला गवसणी घालतात. धैर्य, शूरवीरपणा आणि सामर्थ्य हे या लोकांचे वैशिष्ट्य आहे. हे गुण या लोकांमध्ये असल्याने यांना यश मिळवणे फारसे अवघड होत नाही.

हे लोक फारच महत्वाकांक्षी असतात आणि यांची स्वप्ने मोठी असतात. ठरवलेल्या ध्येयासाठी हे लोक एकनिष्ठ होऊन काम करतात. कितीही मोठी गोष्ट असली तरी देखील ती गोष्ट साध्य करण्यासाठी हे प्रयत्न करतात आणि ती गोष्ट साध्य करतात.

हे लोक जे ठरवतात ते मिळवतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधीही हार न मानणे हा या लोकांचा बाणा असतो. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक ऐशोआरामाचे जीवन जगतात. हे लोक कुणासमोरच झुकत नाहीत. बुद्धिमान असतात, उच्चशिक्षित असतात.

प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक उच्च शिक्षण घेतात. साहित्य आणि विज्ञानात या लोकांना विशेष रस असतो. सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी देखील या लोकांना एक गोष्ट विशेष खटकते ती म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती एवढी सक्षम नसते.

अनेकदा या लोकांना कुटुंबाकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. मात्र जसेजसे वय वाढते तशी तशी ही परिस्थिती सुद्धा बदलते वाढत्या वयानुसार या लोकांकडे पैसा येऊ लागतो. या लोकांना मित्रांची कमतरता भासत नाही. हे लोक इतरांना सहज अट्रॅक्ट करतात म्हणून यांच्या मित्रांची संख्या अधिक असते. मात्र प्रेम संबंधात हे कच्चे असतात.

पण वैवाहिक जीवनात वरचढ ठरतात आणि वैवाहिक जीवन फारच आनंदाने जगतात. मात्र काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की हे लोक एकापेक्षा अधिक लग्न करतात. अंकशास्त्र असे सांगते की या लोकांना पहिल्या लग्नापासून त्रास होऊ शकतो. मात्र सर्वांच्याच बाबतीत असेच घडत नाही काही प्रकरणांमध्ये असे घडते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe