मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, गोव्यासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ Railway Station वर थांबा घेणार

Tejas B Shelar
Published:

Mumbai Railway News : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी असून नववर्ष सुरू होण्याआधीच मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते गोवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

खरे तर येत्या काही दिवसांनी येणाऱ्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण गोव्याला फिरायला जाणार आहेत. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून हजारो नागरिक गोव्याला जातात.

यामुळे मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. यावर्षीही नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमधील हजारो लोक गोव्याला जाणार आहेत.

दरम्यान याच रेल्वे मार्गावर होणाऱ्या या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई येथील सीएसएमटी ते करमाळी दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक?

सीएसएमटी करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण 34 फेऱ्या होणार आहेत. सीएसएमटी करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन 20 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात चालवली जाणार असून ही गाडी या काळात सीएसएमटी येथून दररोज ००.२० वाजता सोडली जाणार आहे आणि करमाळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचणार आहे. तसेच करमाळी सीएसएमटी विशेष एक्सप्रेस ट्रेन 20 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात चालवली जाणार आहे.

ही विशेष गाडी या काळात करमाळी येथून दररोज १४.१५ वाजता सोडली जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचणार आहे. अर्थातच, सीएसएमटी करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या 17 फेऱ्या आणि करमाळी सीएसएमटी विशेष एक्सप्रेसच्या सतरा फेऱ्या अशा एकूण 34 फेऱ्या होणार आहेत.

विशेष गाडी या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवि या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe