मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या 2,398 घरांसाठी लवकरच निघणार लॉटरी, ‘या’ भागातील घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल अडीच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाकडून तयारी सुरू झाली असून मुंबई मंडळ सर्वसामान्यांना परवडणार अशा किमतीमध्ये गोरेगाव पत्राचाळ येथील भूखंडावर तब्बल 2398 घरे विकसित करणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला येत्या तीन-चार वर्षात मुंबईत घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक कामाची राहणार आहे. कारण की, म्हाडा मुंबई मंडळ 2027 मध्ये तब्बल अडीच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाकडून तयारी सुरू झाली असून मुंबई मंडळ सर्वसामान्यांना परवडणार अशा किमतीमध्ये गोरेगाव पत्राचाळ येथील भूखंडावर तब्बल 2398 घरे विकसित करणार आहे. यामुळे आगामी काळात मुंबईत घर घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबईतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मुंबईत घर घ्यायचे असेल तर म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान, म्हाडाचा हा गोरेगाव येथील पत्राचाळीच्या भूखंडावरील अपकमिंग प्रोजेक्ट सर्वसामान्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

म्हाडाकडून गोरेगाव येथील पत्राचाळीच्या भूखंडावर तयार होणाऱ्या घरांसाठी विकासकांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल तीन विकासकांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून या विकासकांकडून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

या भूखंडावर जो प्रकल्प रेडी होत आहे त्या प्रकल्पातील घरे लॉटरी पद्धतीनेच विकली जाणार आहेत. या प्रकल्पात हजारो घरे रेडी होणार असून एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे असणारा हा म्हाडाचा मुंबईतील पहिलाच प्रकल्प राहणार असं आपण म्हणू शकतो.

मुंबईच्या कार्यक्षेत्रात स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी आपल्या उराशी बाळगलेले असते. यासाठी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता नागरिकांचा ओघ हा म्हाडाच्या घरांकडेच असतो.

दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाकडून गोरेगाव पत्राचाळ इथं असणाऱ्या पाच भूखंडापैकी आर-1, आर-7, आर-4 आणि आर-13 या भूखंडांवर नवीन घरे विकसित केली जाणार आहेत. या ठिकाणी म्हाडा मुंबई मंडळाकडून जवळपास अडीच हजार घरे तयार होणार आहेत.

या घरांच्या निर्मितीसाठी विकासकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. महत्त्वाची बाब अशी की, ही घरे 2027 मध्ये पूर्णपणे बांधून रेडी होणार आहेत आणि 2027 मध्येच या घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे.

यामध्ये अल्प गटासाठी 1023, मध्यम गटासाठी 1242 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 133 घरं उपलब्ध असतील अशी प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे. नक्कीच जर तुम्हाला येत्या तीन-चार वर्षात मुंबईत घर घ्यायचे असेल तर म्हाडाची ही घरे तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe