पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये मिळवा! पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दर महिन्याला वीस हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते. दरम्यान आज आपण या लोकप्रिय बचत योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते, गुंतवलेल्या रकमेवर किती व्याज मिळते अन यातून दरमहा वीस हजार रुपये कसे मिळवायचे? याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना चालवल्या जातात. सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम ही देखील अशीच एक लोकप्रिय बचत योजना आहे. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दर महिन्याला वीस हजार रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते.

दरम्यान आज आपण या लोकप्रिय बचत योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते, गुंतवलेल्या रकमेवर किती व्याज मिळते अन यातून दरमहा वीस हजार रुपये कसे मिळवायचे? याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.

कशी आहे ही योजना?

ही पोस्ट ऑफिस ची एक लोकप्रिय योजना असून ही योजना पाच वर्षांमध्ये परिपक्व होते. या योजनेत किमान एक हजार रुपये आणि कमाल 30 लाख रुपये गुंतवता येतात. व्याजाचा भरणा तिमाही आधारावर होतो. कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे.

पण, व्याज उत्पन्न करपात्र आहे. म्हणजेच यामध्ये तुम्ही जी गुंतवणूक कराल त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही पण जे व्याज मिळणार आहे त्यावर तुम्हाला करत लागेल. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला या योजनेत पैसे गुंतवता येतात.

महत्त्वाचे म्हणजे 55 ते 60 वर्षे वयोगटातील जे लोक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेचा (VRS) भाग असतात म्हणजे स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले लोकही यासाठी पात्र ठरतात. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी डिझाइन केलेली ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.

ही योजना हमी परतावा तसेच कर लाभ देते. सध्या, SCSS 8.2% व्याज दर देत आहे, जो मुदत ठेवी आणि इतर बचत योजनांपेक्षा जास्त आहे. योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर दंड लागतो.

ही योजना केवळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आहे, HUF किंवा NRI त्यासाठी पात्र नाहीत. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते.

दरमहा 20 हजार कसे मिळणार?

तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवल्यास, 8.2% वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. हे व्याज तुम्हाला त्रैमासिक आधारावर दिले जाते, म्हणजेच दर तीन महिन्यांनी तुमच्या हातात 61,500 रुपये मिळतील.

हे मासिक आधारावर विभाजित केले तर ते अंदाजे 20,500 रुपये एवढे असेल. म्हणजे तीस लाख रुपये गुंतवल्यास वीस हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe