गुड न्युज ! राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ; महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला.

Tejas B Shelar
Published:

7th Pay Commission News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान, ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला.

याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील याची अंमलबजावणी ही जुलै महिन्यापासूनच करण्यात आली. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53 टक्के करणे अपेक्षित होते.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला. पण आता राज्यात नवीन सरकार आले आहे. कालच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाला आहे.

काल नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होणार असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करून हा महागाई भत्ता 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या काळात होण्याची शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी ही जुलै 2024 पासूनच होणार आहे.

अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचा पगारा सोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे. यामुळे नवीन वर्षाची राज्य कर्मचाऱ्यांची सुरुवात चांगली होईल असे दिसते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याचे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि या वेतना सोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe