महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती ! ऐन हिवाळ्यात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, पावसाला कधीपासून सुरुवात ?

पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडणार असल्याची बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. खरे तर सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कांदा काढणी आणि कांदा लागवडीचे सत्र सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. बंगालच्या उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परावर्तित झाला आणि देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दणका दिला. महाराष्ट्रातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडणार असल्याची बातमी समोर येत आहे.

पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. खरे तर सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कांदा काढणी आणि कांदा लागवडीचे सत्र सुरू आहे.

तसेच काही ठिकाणी कांदा लागवड नुकतीच पूर्ण झालेली आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा स्थितीत जर पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पिकांना आणि कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून दिवसादेखील स्वेटर घालून बसावे लागत आहे. मात्र असे असतानाच येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने हा अंदाज जारी केला आहे. वेधशाळेने म्हटल्याप्रमाणे, १९, २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय २० डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. पुणे परिसरात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे, तसेच १९, २० डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे. हे ढगाळ अन पावसाळी हवामान रब्बी हंगामातील पिकांसाठी तसेच कांदा पिकासाठी विशेष घातक ठरण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe