घरातून सुरु करा ‘या’ 3 प्रकारचा पॅकिंग बिझनेस! घरातून किंवा बाजारात विक्री करून महिन्याला कमवता येतील 20 ते 25 हजार रुपये

मार्केटमध्ये आज आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय दिसून येतात. काही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते व त्यासाठी मोठी जागा लागते. तर काही प्रकारचे व्यवसाय अगदी कमीत कमी भांडवलात सुरू करता येतात व ते तुम्ही अगदी घरातून सुरु करू शकतात.

Ajay Patil
Published:
business idea

Packing Business Idea:- मार्केटमध्ये आज आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय दिसून येतात. काही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते व त्यासाठी मोठी जागा लागते. तर काही प्रकारचे व्यवसाय अगदी कमीत कमी भांडवलात सुरू करता येतात व ते तुम्ही अगदी घरातून सुरु करू शकतात.

व्यवसायाची निवड करताना फक्त थोडेसे संशोधन गरजेचे असते व बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जर तुम्ही व्यवसाय सुरू केले तर तुम्ही कमीत कमी पैशात देखील घरातून लाखो रुपये कमाई करून देईल अशा प्रकारचे व्यवसाय उभे करू शकतात.

अशाच प्रकारे तुम्हाला देखील जर व्यवसाय सुरू करायचा असेल व तो देखील कमीत कमी खर्चात व घरातून तर या लेखामध्ये आपण अशाच तीन प्रकारच्या पॅकिंग व्यवसायांची माहिती घेणार आहोत. ज्या व्यवसायांच्या माध्यमातून तुम्ही घरातून खूप चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळवू शकता.
या तीन प्रकारचे पॅकिंग व्यवसाय घरी बसून देतील कमाई करण्याची संधी

1- बेसन पीठ पॅकिंग व्यवसाय- जर आपण भारतीय खाद्यसंस्कृती बघितली तर यामध्ये सर्वात जास्त खाद्यपदार्थांमध्ये बेसन पिठाचा वापर केलेला असतो. यामध्ये बेसन पिठाचे लाडू असतील किंवा बेसन पिठापासून बनवलेल्या भजी किंवा वडा असेल यासारख्या इतर अनेक खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

बेसन पिठाला प्रत्येक घरात व प्रत्येक हॉटेलच्या माध्यमातून आपल्याला चांगली मागणी असल्याचे दिसून येते. हॉटेलच्या बाबतीत बघितले तर बरेच खाद्यपदार्थ हे बेसन पिठापासून बनवलेले असतात.

अशा प्रकारे बेसन पिठाची मोठी मागणी पाहून तुम्ही स्वतःच्या घरात बेसन पिठाच्या 100 ग्रॅम, 250 ग्रॅम तसेच पाचशे आणि एक हजार ग्रॅमचे पॅकेट पॅक करून स्वतःच्या घरामधून त्यांची विक्री करू शकतात किंवा बाजारात स्टॉल लावून आरामात त्यांची विक्री करता येऊ शकते.

हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्ही होलसेल दरामध्ये हरभरे विकत आणू शकतात व जवळच्या पिठाच्या गिरणीतून दळून त्यांचे वजन काट्यावर वजन करून शंभर ते 1000 ग्राम मध्ये पॅकिंग करून त्यांची विक्री करावी.

यामध्ये पॅकिंगकरिता तुम्हाला पॅकिंगसाठी पॅकेट्स आणि एक विजेवर चालणारी पॅकिंग मशीन लागेल. जे तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सहज खरेदी करता येऊ शकते.

2-हळद,वेलची तसेच लवंग व जिरे पॅकिंग व्यवसाय- आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा छोट्या किराणा दुकानांमध्ये, मोठा किराणा दुकानांमध्ये पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत मिळणारे हळदचे पॅकेट किंवा लवंग, वेलची तसेच जिर्‍याच्या पॅकिंग विक्रीसाठी असल्याचे पाहिले असेल.

या व्यवसायामध्ये बरेच दुकानदार होलसेल दरामध्ये खडा मसाला विकत आणतात व छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅकिंग करून दुकानांमध्ये विक्रीला ठेवतात.

अशाप्रकारे जर होलसेल दरामध्ये तुम्ही खडा मसाला आणला तर तो स्वस्तात मिळतो. अशाप्रकारे जर तुम्ही पॅकेट करून विक्री केली तर एका पॅकेटमागे दोन रुपये जर तुम्हाला मिळत असतील व दिवसाला शंभर पॅकेट विक्री केली तरी दोनशे रुपये आरामात या माध्यमातून नफा मिळतो.

मोठमोठ्या सुपर मार्केटमध्ये देखील असे पॅक केलेले पॅकेट आपल्याला पाहायला मिळतात व या व्यवसायाच्या माध्यमातून एक महिला आरामात घरी बसून सहा हजार रुपयापर्यंत कमाई करू शकते.

3-काजू,बदाम आणि मनुके पॅकिंग व्यवसाय- काजू किंवा बदाम यांची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक प्रामुख्याने 20 ग्राम किंवा पन्नास ग्राम किंवा जास्तीत जास्त 100 ग्रॅम वजनातील पॅकेट विकत घेतात

या वजनाचे काजू बदाम पॅकेट किंवा मनुके पॅकेट सहजपणे दुकानांमध्ये आपल्याला मिळतात. जर आपण बाजारामध्ये बघितले तर काजू, बदाम विकणारे होलसेलर आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

त्यांच्याकडून पाचशे ते सातशे रुपये प्रति किलो किमतीच्या दरम्यान काजू किंवा बदाम विकत घेता येतात व ते वीस ग्रॅम, 50 ग्रॅम तसेच शंभर व पाचशे ग्रामचे पॅकेटमध्ये पॅकिंग करून विक्री करता येतात. अशा प्रकारच्या पॅकेटवर तुम्ही स्वतःच्या गृह उद्योगाचे लेबल लावून तुमच्या ब्रँडने ते विकू शकतात.

या व्यवसायातील जर आर्थिक गणित पाहिले तर ते समजा तुम्हाला एक किलो काजू पाचशे रुपयाला विकत मिळाले व एक किलोमध्ये 50 ग्रॅमची तुम्ही वीस पॅकेट तयार केली व एक पन्नास ग्रामचे पॅकेट तुम्ही 60 रुपयाला विकले तरी वीस पॅकेटचे बाराशे रुपये तुम्हाला मिळतात. एक किलोचे पाचशे रुपये वजा करता तुम्हाला सहाशे रुपये पर्यंत नफा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe