FD News : देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून एफडीवर चांगला जबरदस्त परतावा दिला जात आहे. काही बँकांनी विशेष एफडी योजना देखील राबवल्या आहेत. दरम्यान आज आपण आयडीबीआय आणि पंजाब आणि सिंध बँक या दोन बँकांच्या विशेष FD योजनांबाबत माहिती पाहणार आहोत.
खरेतर, 2024 हे वर्ष संपत आले असून काही कामांची मुदतही जवळ येत आहे. काही बँकांनी ऑफर केलेल्या विशेष एफडीसाठी सुद्धा हा महिना खूप खास आहे. पंजाब आणि सिंध बँकेसह, आयडीबीआय बँकेनेही विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या होत्या, ज्यावर उच्च व्याजदर दिले जात होते.
या दोन्ही एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. याचा अर्थ आता तुमच्याकडे पैसे गुंतवण्यासाठी फक्त काही दिवस आहेत. दरम्यान आता आपण या दोन्ही बँकांच्या एफडी योजनेची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे आयडीबीआय बँकेची विशेष एफडी योजना : IDBI बँकेने 300 दिवस, 375 दिवस, 444 दिवस आणि 700 दिवसांच्या विशेष एफडी लाँच केल्या आहेत. बँकेने त्यांना उत्सव एफडी असे नाव दिले आहे. सामान्य लोकांना या FD वर अनुक्रमे 7.05%, 7.25%, 7.35% आणि 7.20% व्याज दिले जात आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सर्व कार्यकाळांवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.
पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफ डी योजना : पंजाब आणि सिंध बँकेकडून अनेक विशेष एफडी योजना ऑफर केल्या जात आहेत, ज्या वेगवेगळ्या कालावधीसाठी आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार या योजना ३१ डिसेंबरला संपणार आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल आणि जर तुम्ही सुपर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला त्यावरील 0.15 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल. यापैकी एक विशेष एफडी योजना 222 दिवसांची एफडी आहे, ज्यावर 6.30 टक्के व्याज दिले जात आहे.
तर बँक ३३३ दिवसांच्या एफडीवर ७.२० टक्के व्याज देत आहे. तुम्ही 444 दिवसांच्या स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला 7.30 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, बँक 555 दिवसांच्या विशेष एफडीवर 7.45 टक्के व्याज देत आहे. याशिवाय बँक ७७७ दिवसांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे आणि 999 दिवसांच्या FD वर बँक ग्राहकांना 6.65 टक्के व्याज देत आहे.