महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! GR निघाला, आता 2025 मध्ये…..

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात चर्चा आहे. पण, हा निर्णय होण्याआधी राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने दोन दिवसांची अतिरिक्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra 7th Pay Commission News

Maharashtra 7th Pay Commission News : राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवोदित फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात चर्चा आहे.

पण, हा निर्णय होण्याआधी राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने दोन दिवसांची अतिरिक्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे.

म्हणजेच राज्यातील इतर भागातील कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी राहणार नाही मात्र मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना या दिवशी अतिरिक्त सुट्टी राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2025 मध्ये 16 ऑगस्टला गोपालकाला आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी चा सण असून हे दोन दिवस मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी राहणार आहे.

दरवर्षी या संबंधित कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी जाहीर केली जाते. यंदाही या संबंधित कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून याबाबतचा जीआर अर्थातच शासन निर्णय देखील काल म्हणजेच 18 डिसेंबर 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीस सरकारने जारी केलेला हा शासन निर्णय फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना लागु राहणार आहे, याची नोंद घ्यावी.

महागाई भत्ता किती वाढणार

खरे तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. पण हा महागाई भत्ता 53% करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. केंद्र कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 53% दराने महागाई भत्ता मिळतोय.

महत्वाचे म्हणजे केंद्र कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही वाढ जुलै 2024 पासून लागू आहे. म्हणजे या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळालेले आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे.

या चालू महिन्यातच याबाबतचा निर्णय होईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. पण ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकही मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe